NCP leader Ajit Pawar
NCP leader Ajit Pawar  esakal
देश

…तर १०० टक्के अजित पवारच मुख्यमंत्री होतील, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना विश्वास

सकाळ डिजिटल टीम

Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केल्या नंतर अजित पवार यांनी आपल्या ८ आमदारांसह शिंदे फडणवीस सरकार मध्ये शपथ घेतली. यामुळे पक्षात फूट तर पडलीच पण आता महाराष्ट्रात ट्रिपल इंजिनच सरकार आल आहे. यातच आता अजित पवार हे मुख्यमंत्री होतील असे विधान एका मंत्र्यानेच केले आहे.

उपमुख्यमंत्रीपदासह अजित पवारांना अपेक्षित अर्थखातंही मिळालं आहे.याचबरोबर त्याच्या समर्थक मंत्र्यांना चांगली मंत्रीपद मिळाली आहेत. मात्र त्यांच्या गटाकडून वेळोवेळी मुख्यमंत्री पदा बाबद केले जात असलेले विधान हा चर्चेचा विषय ठरत आहे.

काही दिवसापूर्वी अजित पवार यांचा वाढदिवस होता. त्यावेळी अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत ट्वीट केलं होत. “मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच अजितपर्व…”, असं मिटकरींनी ट्विट केलं होत. (amol mitkari tweet on ajit pawar )

दरम्यान, अमोल मिटकरींच्या या ट्वीटवर बोलताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी १४५ च्या आकड्याचा उल्लेख केला. “फक्त पोस्टर्स लावून कोणीही मुख्यमंत्री होत नाही. त्यासाठी १४५ आमदार लागतात, ही गोष्ट अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना अनेकदा सांगितली आहे”, असं ते म्हणाले होते. (hasan mushrif on ajit pawar)

यातच मंत्री अनिल पाटील यांनींही प्रतिक्रिया दिली आहे.ते म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गल्लीपासून दिल्लीच्या नेत्यांना अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत. ही आमची सगळ्यांचीच इच्छा आहे.

पण त्याबरोबर १४५ आमदारांचा आकडा गाठावा लागतो. तो गाठला गेला, तर १०० टक्के अजित पवारच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री होतील. आत्ता तो आकडा आमच्याकडे नाहीये. त्यामुळे शिंदे सरकारच्या पाठिशी आम्ही सगळे आहोत”, असे ते 'टीव्ही९' या वृत्त वाहिनीशी बोलताना अनिल पाटील म्हणाले. (anil patil on ajit pawar)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT