Mayawati sakal
देश

Mayawati : आकाश आनंद पुन्हा मायावतींचे उत्तराधिकारी

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज पुतण्या आकाश आनंद यांची पुन्हा एकदा आपले उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली. तसेच त्यांना पक्षाचे राष्ट्रीय समन्वयकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज पुतण्या आकाश आनंद यांची पुन्हा एकदा आपले उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली. तसेच त्यांना पक्षाचे राष्ट्रीय समन्वयकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी बेजबाबदारपणे वक्तव्य केल्याबद्दल त्याला बाजूला केले होते. तसेच, परिपक्व होईपर्यंत आकाश आनंद यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून दूर ठेवण्यात येईल, असे मायावती यांनी स्पष्ट केले होते. मात्र लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महिन्याभराच्या आतच आकाश आनंद यांच्याकडे पक्षाने मोठी जबाबदारी सोपविली आहे.

बहुजन समाज पक्षाची बैठक आज लखनौमध्ये झाली. आकाश आनंद यांच्याकडे पुन्हा सूत्रे देण्याचा निर्णय मायावती घेऊ शकतात, अशी शक्यता सकाळपासूनच वर्तविण्यात येत होती. एक पत्रक जारी करून मायावतींनी यांनी आपला निर्णय आज जाहीर केला. आकाश आनंद यांनी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक पदापासून राजकारणातील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर १० डिसेंबर २०२३ रोजी मायावतींनी त्यांना आपला उत्तराधिकारी बनवले. परंतु लोकसभा निवडणुकीदरम्यान, सात मे २०२४ रोजी मायावतींनी आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरूनच नव्हे तर उत्तराधिकारी पदावरूनही हटविले.

पंजाब आणि उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत. यासाठी बहुजन समाज पक्षाने १३ स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली, ज्यामध्ये मायावती यांचे नाव पहिल्या स्थानावर आहे आणि आकाश आनंद यांचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. ‘बसप’च्या स्टार प्रचारकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंडचे रामजी गौतम आहेत, तर पंजाबचे रणधीर सिंग बेनिवाल आहेत. उत्तराखंडमधील दोन आणि पंजाबच्या एका विधानसभेच्या जागेवर १० जुलै रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG ODI: इंग्लंड वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? विराट कोहली तंदुरुस्त, पण हार्दिक अजूनही दुखापतीनं त्रस्त

MP Naresh Mhaske : नवी मुंबईत तर 'नाईक जनता पार्टी' चालते; खासदार नरेश म्हस्के यांची टीका

डिझाइन, शाश्वतता आणि प्रवासी अनुभव... नवी मुंबई विमानतळाचा मोठा सन्मान! ‘जगातील सर्वात सुंदर विमानतळ’ यादीत समावेश

Latest Marathi News Live Update : कन्नडमध्ये धारदार शस्त्राने एकाचा खून

Mumbai News: सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शास्त्राने वार करत...; शिवसेना आमदारावर हल्ल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT