akashwani  sakal
देश

राष्ट्रीय बातम्यांचा त्रिशंकू!

ऑक्टोबरपासून दोन बातमीपत्रे मुंबईतून, एक पुण्यातून

मंगेश वैशंपायन -सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : मराठीसह बहुतांश प्रादेशिक भाषांच्या दिल्लीतील प्रसारणावर केंद्र सरकारने वरवंटा फिरविला, त्याला आता चार वर्षे उलटली तरी मराठी राष्ट्रीय बातमीपत्रांचा गाडा सुरळीत होण्याचे नाव घेत नाही. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालयाच्या एका नवीन आदेशानुसार एक ऑक्टोबरपासून सध्या पुण्याहून प्रसारित होणारी राष्ट्रीय बातमीपत्रे पुन्हा मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येणार आहेत.

मात्र यातील दोन बातमीपत्रे मुंबईतून, तर सकाळचे बातमीपत्र पुण्यातूनच प्रसारित होईल, अशी मेख मारण्यात आली आहे. मराठी बातमीपत्रांचा असा ‘त्रिशंकू‘ केल्याने नवीनच अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दिल्लीतून प्रसारित होणारी प्रादेशिक बातमीपत्रे २०१७ मध्ये राज्यांमध्ये हलविण्यात आली. कोरोना लॉकडाउनच्या काळात मुंबईला अडचणी येऊ लागताच ती पुण्याला हलविण्यात आली. आता एक ऑॅक्टोबरपासून पुन्हा ती मुंबईला हलविण्याचा आदेश दिल्ली दरबारातून निघाला आहे. राष्ट्रीय वृत्तसेवा विभागाचे उपसंचालक विराट मजबूर यांनी कालच (ता. २१) हा आदेश काढला आहे. मात्र यातील दुपारचे (१.३०) व रात्रीचे (९.१५) ही राष्ट्रीय बातमीपत्रे मुंबईतून व सकाळी ९.२० चे बातमीपत्र मात्र पूर्ववत पुण्यातूनच प्रसारित केले जाईल, असे आदेशात म्हटले आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार हा निर्णयच विचित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT