Akhilesh Yadav esakal
देश

Akhilesh Yadav : 'तंबाखू खाऊन संसदेत जाणे बंद करा'; अखिलेश यादव असं का म्हणाले?

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - तंबाखू आणि पान खाऊन लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडून प्रादेशिक जनता विकासाची अपेक्षा करू शकत नाही, असं समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी म्हटलं. पान आणि तंबाखू खाऊन सभागृहात गेल्यास विकासाची काय अपेक्षा करता येईल? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. (Akhilesh Yadav news in Marathi)

यादव म्हणाले की, मैनपुरीच्या जनतेने आपली मौल्यवान मते देऊन नेताजींना (मुलायमसिंह यादव) खरी श्रद्धांजली वाहिली आहे. मैनपुरीत सर्व स्तरातील लोकांचा पाठिंबा होता. भाजपचे उमेदवार रघुराज शाक्य यांच्या पोटनिवडणुकीतील धनशक्तीच्या आरोपावर अखिलेश म्हणाले, 'तुम्ही लोकही इटावाचे आहात. इथल्या कामात कोण पैसे कमवतंय हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहीत आहे.

काका शिवपाल सिंह यादव यांचा पक्ष प्रगतीशील समाजवादी पक्ष सपामध्ये विलीन झाला असून लवकरच शिवपाल सिंह यादव यांना पक्षात मोठी जबाबदारी मिळणार असल्याचं अखिलेश यादव यांनी सांगितले. शिवपालसिंग यादव हे गुंडगिरी करत असल्याने आणि पक्षात गुंडांची भर घातल्यामुळे त्यांना सपातून काढून टाकण्यात आले, या कन्नौजच्या खासदाराने केलेल्या विधानावर सपा अध्यक्ष अखिलेश म्हणाले, "सर्वात आधी सुब्रत पाठक यांनी तंबाखू खाणं बंद करावं. त्यांनी तंबाखू खाणं बंद करून कन्नौजच्या विकासाचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी अखिलेश यादव यांनी भाजपचे उमेदवार रघुराज सिंह शाक्य यांनी सपाने धनशक्तीचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. त्यावर अखिलेश यादव यांनी पैशांचा गैरवापर कोणी केला, असा सवाल केला. इटावा सफारी पार्कमुळे चंबळ आणि इटावाला देशात आणि जगात नवी ओळख मिळाली आहे, असे ते म्हणाले. इटावा सफारी पार्कला निधी द्यावा आणि अधिक चांगली व्यवस्था करावी, अशी आमची सरकारकडे मागणी आहे. असे केल्यास सरकारलाही मोठा फायदा होईल आणि पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल, असंही अखिलेश म्हणाले.

हेही वाचाः Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT