Samajwadi Party chief Akhilesh Yadav addressing the media

 

esakal

देश

Akhilesh Yadav VIDEO : "दिवे अन् मेणबत्त्यांवर पैसा का खर्च करायचा?, ‘ख्रिसमस’ मधून शिका" ; अयोध्या दीपोत्सवाच्या पूर्वसंध्येस अखिलेश यादव यांचं वादग्रस्त विधान!

Akhilesh Yadav Controversial Statement : अखिलेश यादव यांच्या वक्त्याचा भाजपने निषेध नोंदवत, आक्रमक भूमिका घेतली आहे

Mayur Ratnaparkhe

Samajwadi Party chief Akhilesh Yadav Remark about Candle and Diya : अयोध्येत होणाऱ्या भव्य दीपोत्सव सोहळ्याच्या पूर्वसंध्येस  समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिवे आणि मेणबत्त्या पेटवण्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. अखिलेश यादव यांच्या वक्तव्यावर भाजपने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि म्हटले की, राम मंदिर आंदोलन विरोध करण्याचा आणि हिंदूविरोधी भावना पसरवण्याचा समाजवादी पक्षाचा इतिहासच आहे.

लखनऊ येथील समाजवादी पक्षाच्या मुख्यालयात पत्रकार परिषदेदरम्यान एका प्रश्नावर उत्तर देताना अखिलेश यादव यांनी म्हटले की, "मला कोणतेही सूचना करायच्या नाही, परंतु मला भगवान रामाच्या नावाने एक सूचना करायची आहे. जगभरात, ख्रिसमसच्या वेळी शहरे प्रकाशित केली जातात आणि हे महिनाभर चालू राहते. आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे. दिवे आणि मेणबत्त्यांवर इतके पैसे का खर्च केले जातात आणि इतके डोकं का लावायचं? या सरकारकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? ते हटवले पाहिजे. आमचे सरकार सत्तेत आल्यावर, आम्ही सुंदर रोषणाईची व्यवस्था करू."

तर अखिलेश यादव यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाल यांनी प्रत्त्युत्तर दिले आहे. त्यांनी म्हटले की, "ज्या पक्षाने राम मंदिर चळवळीला विरोध करण्याचा, अयोध्याला वर्षानुवर्षे अंधारात ठेवण्याचा आणि रामभक्तांवर गोळीबार करण्याचा अभिमान बाळगला होता, तो पक्ष आता दीपोत्सवासाठी शहराच्या सजावटीला विरोध करत आहे. सैफईमध्ये त्यांनी उत्सव साजरा केला तेव्हा त्यांना अभिमान वाटला, ज्यामुळे सामान्य लोकांना कोणताही फायदा झाला नाही."

अयोध्येत दीपोत्सवाची यंदा नववी वेळ आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी, म्हणजेच १९ ऑक्टोबर रोजी, शरयू नदीच्या काठावरील ५६ घाटांवर २६,११,१०१ मातीचे दिवे प्रज्वलित केले जाणार आहे. दीपोत्सव २०२५ मध्ये २६ लाख दिवे, २,१०० वैदिक विद्वान, १,१०० ड्रोन आणि ३३,००० स्वयंसेवक शिस्त आणि सामूहिक भक्तीचे नेत्रदीपक प्रदर्शन करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bus Accident :भीषण अपघात! चालकाचे नियंत्रण सुटले अन् बस खडकावर आदळली, १५ जणांचा मृत्यू

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

Chhagan Bhujbal: काल 'ओबीसी'च्या मंचावर, आज नाराजीचा सूर! वडेट्टीवारांच्या व्हिडीओवरुन भुजबळांना सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT