Samajwadi Attar 
देश

UP Election : अखिलेश यादवांनी लॉन्च केलं 'समाजवादी अत्तर'

निवडणुकीत यापुढेही भन्नाट प्रचार होताना पहायला मिळेल

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला आता रंग चढायला लागला आहे. मतदारांच्या लक्षात रहावा असा हटके प्रचार करण्यावर राजकीय पक्ष भर देत आहेत. यात माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आघाडी घेतली आहे. आपल्या पक्षाचं चिन्ह आणि नाव असलेलं अत्तर त्यांनी लॉन्च केलं आहे. या अत्तराचं विशेष म्हणजे यामध्ये २२ नैसर्गिक सुगंधी द्रव्ये वापरण्यात आली आहेत.

या अत्तराच्या लॉन्चप्रकरणी अखिलेश यादव म्हणजे, "हे अत्तर २०२२ मधील विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवेल." या परफ्युमच्या बॉक्सवर अखिलेश यादव यांच्यासह समाजवादी पार्टीचं निवडणूक चिन्ह छापण्यात आलं आहे. समाजवादी पार्टीचे नेते कनौज आणि उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे आमदार पुष्पराज जैन यांनी या समाजवादी अत्तराचं उद्घाटन केलं. उद्घाटनावेळी जैन म्हणाले, "जेव्हा लोक हा परफ्युम वापरतील तेव्हा त्यांना समाजवादाचा सुगंध येईल. समाजवादी अत्तर येत्या निवडणुकीत द्वेषाचं राजकारण संपवेल."

समाजवादी पक्षानं अशा प्रकारे निवडणूक काळात पहिल्यांदाच परफ्युम लॉन्च केलेला नाही. यापूर्वी सन २०१६ मध्ये अखिलेश यादव यांनी विविध परफ्युम्स लॉन्च केले होते. त्याला त्यांनी 'समाजवादी सुगंध' असं नावंही दिलं होतं. त्यावेळी त्यांच्या सरकारला राज्याच चार वर्षे पूर्ण झाली होती. त्यावेळी या प्रत्येक कुपीवर चार विविध शहरांची नाव दिली होती. यामध्ये आग्रा, लखनऊ, वाराणसी आणि कनौज या शहरांच्या नावांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT