Akhilesh Yadav sakal media
देश

अखिलेश यादव लढवणार नाहीत उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक!

राष्ट्रीय लोकदल आणि समाजवादी पार्टीची युती

Amit Ujagare (अमित उजागरे)

लखनऊ : उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक पुढील वर्षी मार्च-एप्रिल दरम्यान होण्याची चिन्हे आहेत. पण ही निवडणूक आपण लढवणार नाही, असं समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे. आगामी निवडणुकीसाठी अखिलेश हे सपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अखिलेश यादव म्हणाले, "उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकदल आणि समाजवादी पार्टीमध्ये युती झाली आहे, जागा वाटपही लवकरच अंतिम होईल. परंतू मी ही निवडणूक लढवणार नाही" अखिलेश यादव हे सध्या आझमगड येथून खासदार आहेत. तसेच ते समाजवादी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत.

भाजपाची सत्तेतून हाकालपट्टी करायची आणि समाजवादी पार्टीला सत्तेत आणायचा विचार आता उत्तर प्रदेशमधील सर्व वर्गातील लोकांनी केला आहे. समाजवादी पार्टी पुन्हा सत्तेत येणार असल्यानं उत्तर प्रदेशला पुन्हा समृद्धीचा मार्गावर येईल, असं अखिलेश यादव रविवारी हरदोई येथील सभेत म्हणाले होते.

"समाजवादी पार्टीनं केलेल्या कामांची उद्घाटनं सध्या भाजप राज्यात करत आहे. बाबा मुख्यमंत्री हे मजेशीर मुख्यमंत्री आहेत ज्यांनी स्वतःच्या सरकारनं केलेल्या कामांची उद्घाटनं केली नाहीत," अशी खोचक टीकाही अखिलेश यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT