Akhilesh Yadav Akhilesh Yadav
देश

‘भाजपशी स्पर्धा करू शकत नाही, निवडणूक आयोगाने पैसे द्यावे’

आयोगाच्या या निर्णयामुळे सपा प्रमुख अखिलेश यादव चांगलेच संतापले

सकाळ डिजिटल टीम

लखनौ : निवडणूक आयोगाने शनिवारी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. त्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान होणार आहे. यादरम्यान कोणत्याही राज्यात रॅली आणि रोड शोला परवानगी दिली जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे सपा (samajwadi party) प्रमुख अखिलेश यादव (akhilesh yadav) चांगलेच संतापले. त्यांनी निवडणूक आयोगाने पैसे द्यावेत, अशी मागणी केली.

समाजवादी पक्षाचे (samajwadi party) राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शनिवारी सांगितले की, निवडणूक आयोग २०२२ च्या यूपी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांसाठी व्हर्च्युअल रॅलींच्या बाजूने असेल तर आयोगाने ते सर्व राजकीय पक्षांसाठी समान क्षेत्र बनवले पाहिजे. कोरोनाच्या काळात पहिल्यांदाच अशा प्रकारची निवडणूक होणार आहे. आयोगाने अनेक नियम बनवले आहेत. व्हर्च्युअल रॅलींबद्दल बोलायचं झालं तर आयोगाने त्या पक्षांचाही विचार करायला हवा, ज्यांच्याकडे आभासी रॅलीसाठी पुरेशी पायाभूत सुविधा नाही, असे अखिलेश यादव (akhilesh yadav) म्हणाले.

निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना काही निधी द्यावा जेणे करून ते एक पाऊल पुढे जातील. पायाभूत सुविधा तयार होतील. आम्ही भाजपच्या (BJP) पायाभूत सुविधांशी (Digital campaign) स्पर्धा करू शकत नाही. आम्ही आवाहन करतो की निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना काही निधी द्यावा. जेणेकरून लोकशाही व्यवस्थेत भाजप इतके मजबूत नसलेले सर्व राजकीय पक्ष स्पर्धा करू शकतील, असे अखिलेश यादव (akhilesh yadav) म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur heavy rain: सोलापुरातील पावसामुळे देगाव ओढ्याला पूर; शेतीचं मोठं नुकसान, पाच तासांत होत्याचं नव्हतं झालं

Balwan Punia: ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर बजरंग पुनियाच्या यशामागचा आधारस्तंभ हरपला! वडील बलवान पुनिया यांचे निधन

Pune News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले; पुण्यातील घटना

Pune News : प्रभाग रचनेवर संताप; पुण्यात नागरिकांचा घोषणाबाजीचा धडाका

Neelam Gorhe : शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात डॉ. नीलम गोऱ्हे यांचे कार्यकर्त्यांना लोकप्रतिनिधी होण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT