Kedarnath Temple esakal
देश

Kedarnath Temple : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर चारधाम यात्रेला सुरुवात,भाविकांसाठी केदारनाथचे दरवाजे उघडले, पाहा व्हिडिओ

Kedarnath Temple : अक्षय तृतीयेच्या निमित्ताने प्रसिद्ध तीर्थक्षेत्र केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Kedarnath Temple : आज देशभरात अक्षय तृतीयेचा उत्साह पहायला मिळत आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्ताने प्रसिद्ध तीर्थक्षेत्र केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले आहेत. केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर, उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेला सुरूवात झाली आहे.

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर चारधाम यात्रेला सुरूवात झाल्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हजारो भाविक केदारनगरीत दाखल झाले असून यावेळी जय केदारच्या जयघोषाने केदारनगरी दुमदुमून गेली आहे.

केदारनाथ धामचे प्रमुख रावल भीमाशंकर लिंग यांनी संपूर्ण पूजाविधी करून केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले. सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामीही उपस्थित होते.

केदारनाथचे दरवाजे उघडल्यानंतर यमुनोत्री धामचे दरवाजे सकाळी १०.२९ मिनिटांनी आणि गंगोत्री धामचे दरवाजे दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी उघडले जातील. दरम्यान, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी दर्शन आणि पाहणीसाठी सकाळी ७ वाजता केदारनाथ धामला पोहोचले होते.

केदारनाथ धामचे महत्व

केदारनाथचे मंदिर हे उत्तराखंड राज्यात स्थित आहे. उत्तराखंड राज्यातील रूद्रप्रयाग जिल्ह्यातील शंभू महादेवाचे पवित्र स्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोनं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; उच्चांकापेक्षा ₹27 हजारांनी कमी, पाहा आजचा भाव

Jalgaon Crime : जळगाव हादरलं! गणपतीच्या तयारीदरम्यान सैनिकाच्या पत्नीनं 5 वर्षांच्या चिमुरड्यासह पंख्याला ओढणीच्या सहाय्याने घेतला गळफास

आशिया कपची ट्रॉफी जिंकली, पण टीम इंडियाची ‘ही’ कमकुवत बाजू आली समोर; ५ सामन्यांत १३ झेल सोडले, मुझुमदार म्हणाले- सुधारण्यासाठी मेहनत सुरू

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Rajaram Puri Ganesh Procession : पहिल्याच दिवशी ओलांडली आवाजाची मर्यादा राजारामपुरी गणेश आगमन मिरवणूक ; आकर्षक विद्युत रोषणाई, ‘सिग्नल’मुळे वेळेचे गणित बसले

SCROLL FOR NEXT