Bihar CM Nitish Kumar esakal
देश

मद्य पिणारे महापापी : नितीश कुमार

बिहारमध्ये प्रतिबंध-अबकारी कायदा कडक

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : मद्य पिणारे महापापी तसेच महाअयोग्य आहेत, असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले.

विधानसभेत बिहार प्रतिबंध आणि अबकारी दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले. त्यावेळी ते पुढे म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्त्वांचे पालन न करणारे तर भारतीय सुद्धा नाहीत. एखाद्याचा बापूंच्या तत्त्वांवर विश्वास नसेल तर आम्ही त्यांना भारतीय मानत नाही.

बिहारमध्ये २०१६ मध्ये प्रतिबंध आणि अबकारी कायदा लागू करण्यात आला. त्यानुसार राज्यात मद्याचे उत्पादन, व्यापार, साठा, वाहतूक, विक्री आणि सेवनास मनाई आहे. यानंतरही बनावट दारूच्या सेवनामुळे असंख्य व्यक्ती दगावण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे या कायद्याची अंमलबजावणी परिणामकारक होत नसल्याचे आरोप सरकारवर झाले आहेत. त्यासाठी दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार मद्यविक्रेत्यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केली जाऊ शकते. याशिवाय नेहमी मद्यपान करणाऱ्यांना दंड आणि कारावास अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. उत्पादन शुल्क मंत्री सुनील कुमार यांनी सांगितले की, निरपराध व्यक्तींचा छळ केला जाणार नाही, पण दोषींना मोकळे सोडले जाणार नाही.

मद्यावरील बंदीमुळे भाज्यांचा खप वाढला

जगभर मद्यपानामुळे काय दुष्परिणाम झाले आहेत याची जाणीव लोकांना करून दिली गेली पाहिजे, असे आवाहन नितीश कुमार यांनी केले. मद्यपान सोडण्याच्या फायद्यांचाही त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, भाज्यांची विक्री वाढली आहे. आता जेवण फार चांगले बनते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Crash: शेअर मार्केट क्रॅश! सेन्सेक्स तब्बल ७०० अंकांनी घसरला; गुंतवणूकदारांचे ५ लाख कोटी रुपये बुडाले

ITR Filing 2026: कर बचतीची संधी सोडू नका! New Tax Regime मधील हे 8 फायदे बहुतेकांना माहितीच नाहीत

Navi Mumbai: नवी मुंबईच्या ५,५७५ कोटींच्या मेट्रो प्रकल्पास मंजुरी, राज्य सरकारकडून हिरवा कंदील

भीषण अपघात! बसमधून उरताच ट्रकने उडवलं, चिमुकलीसह दोघांचा दुर्दैवी मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर...

Maharashtra Rain Update: मान्सूनची आगेकूच! महाराष्ट्रात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता; IMD ची मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT