Russia Ukraine War
Russia Ukraine War  Sakal
देश

Ukraine : ''अखेर सुमीत अडकलेल्या सर्व 694 भारतीय विद्यार्थांची सुटका''

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युक्रेनमधील सुमी शहरात अडकलेल्या सर्व ६९४ भारतीय विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Union minister Hardeep Singh Puri) यांनी दिली आहे. सुमीमधील सर्व भारतीय (Indian In Ukraine) विद्यार्थी बसमध्ये बसून पोल्तवासाठी रवाना झाले आहेत असेही पुरी यांनी सांगितले. दरम्यान, सुमीमधून भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका करण्यात आल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. (All Indian Student Evacuate From Sumy )

रशियन आणि युक्रेनियन अधिकार्‍यांनी रशियन सैन्याने वेढलेल्या काही गावे आणि शहरांमधून नागरिकांना बाहेर पडण्याची परवानगी देण्यासाठी कॉरिडॉर स्थापित करण्यास सहमती दिली आहे. त्यानंतर युक्रेनने उत्तर-पूर्वेकडील सुमी शहर आणि राजधानी कीव्हजवळील इरपिन शहरातून नागरिकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे.

तत्पूर्वी, नवी दिल्लीतील रशियन दूतावासाने ट्विट करून ही माहिती दिली होती की, सुमीमधून भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी रशिया भारतीय वेळेनुसार 13.30 वाजता युद्धविराम करेल जेणेकरून विशेष कॉरिडॉर तयार करता येईल.

युद्धाचा आजचा तेरावा दिवस

रशिया-युक्रेन या दोन्ही देशांमध्ये युद्धाचा आजचा 13 वा दिवस असून, युक्रेनची राजधानी किव्हपासून 350 किमी पूर्वेला असलेल्या सुमीमध्ये रशियन लष्कराने हवाई हल्ला केला असून, यामध्ये दोन मुलांसह किमान नऊ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

ऑपरेशन गंगा अंतर्गत 13 हजारांहून अधिकांची सुटका

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुखरुप परतीसाठी भारत सरकारकडून ऑपरेशन गंगा चालवण्यात येत आहे. या ऑपरेशन अंतर्गत आतापर्यंत भारताने 13 हजाराहून अधिक भारतीयांना सुखरुप मायदेशात आणले आहे. तर सुमारे तीन हजार भारतीय युक्रेनच्या शेजारील युरोपीय देशांमध्ये सुरक्षितपणे पोहोचले आहेत. (Russia Ukraine Latest News In Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला; फुलांचा हार घालायला आला अन्...; व्हिडिओ व्हायरल

Uddhav Thackeray: मोदीजी हिंमत असेल तर संपवण्याचा प्रयत्न करुन बघा...; उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

175 प्रवासी घेऊन जाणाऱ्या विमानाला लागली आग; दिल्ली विमानतळावर एमरजेन्सी घोषित

PM Modi In Mumbai: राहुल गांधींना फक्त एक गोष्ट करायला सांगा; पंतप्रधान मोदींचे शरद पवारांना आव्हान

Latest Marathi News Live Update: मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोड?

SCROLL FOR NEXT