Unlock  sakal media
देश

राजधानी दिल्ली निर्बंधमुक्त; महाराष्ट्रात कधी होणार घोषणा?

प्रवासी आता बस आणि मेट्रोमध्ये उभे राहूनही प्रवास करू शकणार आहेत.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाची प्रकरणे कमी झाल्याने कोविडचे जवळपास सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले असून, रात्रीच्या वेळी लावण्यात आलेला कर्फ्यूदेखी हटवण्यात आला आहे. यासोबतच प्रवासी आता बस आणि मेट्रोमध्ये उभे राहूनही प्रवास करू शकणार आहेत. डीडीएमएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातही कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने घट नोंदवण्यात येत आहे. माज्ञ, अद्यापही महाराष्ट्रात काही निर्बंध शिथिल करण्यात आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रात निर्बंधमुक्तीची घोषणा कधी होणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (All covid Restriction Cancelled In Delhi)

दिल्लीतील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात आल्याने दुकाने उघडण्याची आणि बंद करण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंधही मागे घेण्यात आली आहे. दरम्यान, डीडीएमएच्या बैठकीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व निर्बंध हटवण्यासाठी पुढाकार घेतल्याचे तसेच दबाव टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीतील कोरोना कमी होत आहे, आम्हाला लोकांच्या रोजगाराची काळजी घ्यावी लागेल असे केजरीवाल यांनी बैठकीत मत मांडले होते.

केजरीवालांचे ट्वीट

निर्बंध मागे घेण्याच्या घोषणेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, कोरोनाबाबत स्थिती सुधारल्यानंतर, लोकांना समस्यांचा सामना करावा लागत असल्याने डीडीएमएने सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून शाळा पूर्णपणे ऑफलाइन सुरू होणार असल्याचे त्यांनी नमुद केले असून, सर्व नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानी लष्करावर हल्ला करण्याचा कट! कर्नाटकात तरुणाला अटक; कोण आहे असफुल मलिक?

घरात काम करणारीच्या मानेवर लव्ह बाइट; तिने बॉयफ्रेंडचं नाव सांगताच पूजा बेदी झालेली शॉक; निघाला अभिनेत्रीचा...

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भारताकडून वेल्सचा ३-१ असा पराभव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

SCROLL FOR NEXT