All politicians paid tribute to Mahatma Gandhiji on his death anniversary 
देश

Mahatma Gandhi : प्रियांकांनी शेअर केली गांधीजींची सुंदर आठवण; व्हिडिओ बघाच!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशाचे राष्ट्रपीता महात्मा गांधी यांची आज (ता. 30) 72वी पुण्यतिथी. 30 जानेवारी 1948 दिल्लीच्या बिर्ला भवन बागेत प्रार्थना सभा संपवून निघताना नथुराम गोडसेने त्यांची गोळी मारून हत्या केली. पण स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या महात्म्याच्या आठवणी व आदर आजही देशवासियांच्या मनात आहे. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देशभरातून गांधीजींना श्रद्धांजली वाहिली जात आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही गांधीजींचा एक खास व्हिडिओ शेअर करत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे.  

इंदिरा गांधींची नात व काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी एक खास व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत साधारण एक वर्षाच्या बाळाला चक्क गांधीजी खेळवत आहेत, असा तो व्हिडिओ आहे. गांधीजी त्या बाळाला मांडीवर घेऊन खेळवत आहेत, हासवत आहेत. ते बाळही छान हासतंय, उड्या मारतंय. या व्हिडिओला प्रियांका यांनी 'बापू तुम जिंदा हो, खेतों में खलिहानों में न्याय, सत्य और प्रेम के अरमानों में' असे कॅप्शन दिले आहे. मात्र, हे बाळ कोण आहे, हे माहीत नाही. 

हा व्हिडिओ आज प्रियांका यांनी ट्विटरवर शेअर केल्याने गांधीजींच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. 

प्रियांकासह सर्वच पक्षांच्या बड्या नेत्यांनी गांधीजींना सोशल मीडियावरून श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही गांधीजींचे समाधीस्थळ राजघाट येथे जाऊन श्रद्धांजली अर्पण केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puja Khedkar: दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर कुठे गायब? घरात आले जेवणाचे दोन डबे; नेमका प्रकार काय?

IND vs PAK, Asia Cup: 'पाकिस्तान नाही, पोपटवाडी संघ', गावसकर भारताच्या विजयनंतर थेटच बोलले

Viral Video : तरुणीने क्षणात संपविले जीवन; लोकांनी खूप समजावलं पण कोणाचंच ऐकलं नाही, हृदयद्रावक व्हिडिओ

Education News : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: आता ५२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना द्यावी लागणार ‘टीईटी’ परीक्षा

Ghati Hospital: एमडी एमएस’च्या ८५ जागा वाढणार; ‘घाटी’त रुग्णसेवेला मिळेल बळकटी, तज्ज्ञ होण्याची संधी

SCROLL FOR NEXT