Allahabad High Court marathi news-Duty of husband to give maintenence allowance to wife-Latest news 
देश

Allahabad High Court: नोकरी नसेल तर मजूरी करा पण पत्नीला भत्ता द्या; उच्च न्यायालयाचा आदेश

Allahabad High Court: अलाहाबाद उच्च न्यायालयाने देखभाल भत्त्याशी संबंधित एका प्रकरणात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. पतीला नोकरीतून कोणतेही उत्पन्न नसले तरी तो पत्नीला भत्ता देण्यास बांधील आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

Sandip Kapde

Allahabad High Court:  अलाहाबाद उच्च न्यायालयाने देखभाल भत्त्याशी संबंधित एका प्रकरणात महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. पतीला नोकरीतून कोणतेही उत्पन्न नसले तरी तो पत्नीला भत्ता देण्यास बांधील आहे, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. अकुशल कामगार म्हणून तो दररोज सुमारे 300-400 रुपये कमवू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाच्या न्यायमूर्ती रेणू अग्रवाल यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पुरुषाची पुनर्विचार याचिका फेटाळताना ही टिप्पणी केली आहे. कौटुंबिक न्यायालयाने याचिका करणाऱ्या पतीला आदेश दिले होते की त्याने त्याच्या पत्नीला २ हजार रुपये मासिकव भत्ता द्यावा. मात्र पतीने 21 फेब्रुवारी 2023 रोजी अहलाबाद उच्च न्यायालयात कौटुंबिक न्यायालय क्रमांक 2 च्या आदेशाला आव्हान देत पुनरीक्षण याचिका दाखल केली होती. यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुनावणी घेत नवीन आदेश दिले आहेत. (Allahabad high court News in Marathi)

याचिकाकर्त्याची 2015 मध्ये लग्न झाले होते. त्यानंतर पत्नीने हुंड्याचा आरोप करत पती आणि सासरच्या लोकांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर ती वेगळी राहू लागली. २०१६ मध्ये पत्नी तिच्या आई-वडिलांसोबत राहू लागली. या प्रकरणात कौटुंबिक न्यायालयाने पतीला देखभाल भत्ता देण्यास सांगितले होते. यानंतर पतीने अलाहाबाद हायकोर्टात जाऊन सांगितले की, त्याची पत्नी पदवीधर आहे आणि शिकवणीतून दरमहा 10,000 रुपये कमावते. मात्र मुख्य न्यायमूर्तींनी हे विचारात घेतले नाही.

सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने सांगितले की, पत्नी शिकवून दरमहा 10,000 रुपये कमावते हे सिद्ध करण्यासाठी पती कोणतेही कागदपत्र सादर करू शकत नाही. अशा परिस्थितीत त्याचे आई-वडील आणि बहिणी त्याच्यावर अवलंबून आहेत आणि तो शेती करून काहीतरी कमावतो, हा त्याचा युक्तिवादही न्यायालयाने विचारात घेतला नाही.

पती एक निरोगी व्यक्ती आहे आणि पैसे कमविण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे, असे न्यायालयाने नमूद केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तो पत्नीला भरणपोषण देण्यास बांधील आहे. जर त्याने स्वत:ला मजुरीच्या कामात गुंतवले तर तो अकुशल कामगार म्हणून किमान वेतनातून दररोज सुमारे 300-400 रुपये कमवू शकतो. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फास्ट ट्रॅक कोर्टाला पहिल्याच दिवशी ब्रेक, CBIचे वकीलच आले नाहीत; पेपर फुटी प्रकरणी सुनावणी ढकलली पुढे

अभिजीत दीपकेंच्या लग्नाची तयारी? आईने सांगितलं कशी हवी सून? म्हणाल्या, ''आमच्याकडे अनेक स्थळं आली पण...''

Crime: धक्कादायक! बाथरूमला जाऊ दिलं नाही म्हणून मुलाने पँन्टमध्ये लघवी केली; संतापात शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या गुप्तांगाला चटके दिले

Latest Marathi News Live Update: हा राजीनामा केवळ एक सुरुवात आहे - सोनम वांगचुक

Guru Purnima 2026: 29 जुलैला बनतोय 'केंद्र दृष्टी योग'; दुर्मिळ योगामुळे चमकणार या राशींचे भाग्य!

SCROLL FOR NEXT