Afzal Ansari 
देश

Afzal Ansari: भाजप आमदाराच्या हत्येप्रकरणी कुख्यात गँगस्टरच्या भावाची शिक्षा रद्द! खासदारकीही वाचली

अफझल अन्सारीवर गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानं त्याची खासदारकी धोक्यात आली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे गाजिपूरचा खासदार अफजल अन्सारी यांची खासदारकी वाचली आहे. अलाहाबाद हायकोर्टानं त्यांना मोठा दिलासा देताना त्यांना PMLA कोर्टानं सुनावलेली चार वर्षांची शिक्षा रद्द केली. हायकोर्टानं या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता तो आज जाहीर केला.

अफझल अन्सारी यांना विषेश पीएमएलए कोर्टानं गँगस्टर अॅक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांतर्गत चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरोधात अन्सारीनं हायकोर्टात धाव घेत आपली शिक्षा रद्द व्हावी, यासाठी याचिका दाखल केली होती. दुसरीकडं राज्य सरकारनं आणि कृष्णानंद राय यांचे पुत्र पियुष कुमार राय यांनी हायकोर्टात त्यांच्या शिक्षेत वाढ करण्याची मागणी करण्याची याचिका दाखल केली होती.

२०२३ मध्ये गाझिपूरच्या कोर्टानं खासदार अफझल अन्सारी यांना अपहरण आणि कृष्णानंद राय यांच्या हत्या प्रकरणात चार वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसंच १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.

दरम्यान, तुरुंगात असताना अन्सारी यांनी समाजवादी पक्षाच्या तिकीटावर गाझिपूर लोकसभा मतदारसंघातून २०२४ मध्ये पुन्हा निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले आहेत. भाजपच्या पारसनाथ आणि बसपाच्या उमेश कुमार सिंह यांच्याविरोधात ते १,२४,८६१ मतांनी निवडून आले. अफझल अन्सारी हे गोळीबारात ठार झालेला गँगस्टर आणि राजकारणी मुख्तार अन्सारीचे भाऊ आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT