Allahabad HC esakal
देश

Allahabad HC : 'सप्तपदींशिवाय हिंदू विवाह अपूर्णच, अशा लग्नाला मान्यता नाही; उच्च न्यायालयाची टिप्पणी

अलाहाबाद हायकोर्टाने एका प्रकरणावर सुनावणी करताना ही टिप्पणी केली

सकाळ डिजिटल टीम

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन होय. लग्नामध्ये दोन्ही कुटुंबे एकत्र येतात. हिंदू धर्मामध्ये लग्नाला विशेष महत्व आहे. पारंपारिक रितिरिवाजाप्रमाणे लग्नाचे सर्व विधी पार पाडले जातात.

लग्नामध्ये सात फेरे किंवा सप्तपदी घेतली जाते. हे सात फेरे घेत असताना नवरा-नवरी एकमेकांप्रती वचने घेतात. त्यामुळे, या सात फेऱ्यांना लग्नामध्ये विशेष महत्व असते.

नुकत्याच एका प्रकरणात या संदर्भात अलाहाबाद हायकोर्टाने सुनावणी केली आहे. ही सुनावणी करताना सात फेरे आणि इतर विधींशिवाय हिंदू विवाह हे वैध नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये स्मृती सिंह यांनी एक याचिका दाखल केली होती. या प्रकरणामध्ये एका पतीने घटस्फोट न घेता आपल्या पत्नीने पुनर्विवाह केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे, तिला शिक्षा झाली पाहिजे असे त्याने म्हटले होते. अलाहाबाद न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणाची प्रक्रिया आता रद्द केली आहे.

विवाहासाठी सप्तपदी आवश्यक

या याचिकेला परवानगी देताना न्यायमूर्ती संजय कुमार सिंह म्हणाले की, “विवाहासंदर्भातील 'विधी' या शब्दाचा अर्थ योग्य पद्धतीने विवाह समारंभ आणि योग्य पद्धतीने विवाह सोहळा करणे असा ठरलेला नियम आहे. जोपर्यंत विवाह व्यवस्थित रित्या पार पडत नाही तोपर्यंत तो विवाह सोहळा मानला जात नाही.

पुढे न्यायालयाने म्हटले आहे की, “पक्षकारांना लागू असलेल्या कायद्यानुसार जर हा विवाह वैध नसेल तर कायद्याच्या दृष्टीने तो विवाह नाही. 'सप्तपदी' समारंभ हा हिंदू कायद्यानुसार वैध विवाहासाठी आवश्यक घटकांपैकी असलेला एक घटक आहे. परंतु, सध्याच्या प्रकरणात या पुराव्याचा अभाव आहे.

या प्रकरणात उच्च न्यायालयाने हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 7 चा दाखला दिला आहे. या कलमानुसार, हिंदू विवाह सोहळा हा संपूर्ण विधींसह केला पाहिजे. ज्यामध्ये सप्तपदी (विवाह सोहळ्यासाठी वधू-वरांनी अग्नीला साक्षी मानून सात फेरे घेणे) विवाह सोहळा पूर्ण करते. या सात फेऱ्यांमुळे लग्न बंधनकारक होते.

नेमक प्रकरण काय ?

स्मृती सिंह यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. २०१७ मध्ये स्मृती सिंह यांचे लग्न सत्यम सिंह यांच्याशी झाले होते. मात्र, लग्नानंतर त्यांच्या नातेसंबंधांमध्ये तणाव आला. या कटुतेमुळे स्मृती यांनी सासरचे घर सोडले.

हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप करत स्मृती यांनी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या घटनेचा तपास करताना पोलिसांनी पती सत्यम आणि सासरच्या लोकांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर, पती सत्यमने स्मृतीवर दुसरे लग्न केल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT