Amar Jawan Jyoti - Rahul Gandhi Team eSakal
देश

"आम्ही अमर जवान ज्योत पुन्हा पेटवू, काहींना बलिदानाचा अर्थ समजत नाही"

अमर जवान ज्योत दुसरीकडे नेण्यावरून राहुल गांधींची केंद्रावर टीका.

सकाळ डिजिटल टीम

देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मरणार्थ दिल्लीच्या इंडिया गेटवर गेल्या 50 वर्षांपासून धगधगत असलेली 'अमर जवान ज्योती' (Amar Jawan Jyoti) राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन होणार आहे. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं. त्यानिमित्ताने आता शुक्रवारी पार पडणाऱ्या कार्यक्रमात अग्नीला नवीन ठिकाणी नेण्यात येणार असून, इंडिया गेट परिसरात असणारी अमर जवान ज्योती यानंतर जळताना दिसणार नाही. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रजासत्ताक दिनापूर्वी (republic day) लष्करी अधिकाऱ्यांसह पंतप्रधानांनी युद्धस्मारकाला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ही अमर जवान ज्योती आता राष्ट्रीय युद्ध स्मारकारत विलीन करण्यात येईल. राहुल गांधींनी याबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. 'आपल्या वीर जवानांसाठी जी अमर जवान ज्योती तेवत होती, तिला आज विझवण्यात येईल, हे अत्यंत दुखद आहे. काही लोकांना देशप्रेम आणि बलिदानाचा अर्थ समजत नाही. मात्र आम्ही आपल्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योति पुन्हा एकदा पेटवू असं राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान, 1971 च्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतीची स्थापना करण्यात आली. या युद्धात भारताचा विजय झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. 26 जानेवारी 1972 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्घाटन केले होते. इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे सर्व सैनिकांच्या स्मरणार्थ एक स्मारक आहे, जिथे रायफल आणि सैनिकांचे हेल्मेट संगमरवरी लावलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: राजा बहाद्दूरमिलमधील 'डी मोरा' पबमध्ये फ्रेशर पार्टीत अंडर 21 च्या मुलांचं तुफान राडा

Ganeshotsav 2025: ढोल-ताशा सरावासाठी तयार आहात? 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Akola Elections: अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम; इच्छुकांमध्ये विविध प्रतिक्रिया

राज्य उत्सवाचा राजकीय ‘इव्हेंट’ नको

'लास्ट स्टॉप खांदा' चित्रपटातून उलगडणार प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट; हास्यजत्रेमधील 'हा' अभिनेता दिसतोय मुख्य भूमिकेत

SCROLL FOR NEXT