Amarnath Pilgrimage Viral Video ESakal
देश

Viral Video: ब्रेक फेल झाला अन् लोकांनी धावत्या गाडीतून उड्या ठोकायला सुरूवात केली; पाहा अमरनाथ यात्रेकरूंबरोबर काय घडले

Amarnath Pilgrimage: बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याचे प्रवाशांना कळताच आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी धावत्या बसमधून उड्या मारायला सुरुवात केली.

आशुतोष मसगौंडे

मंगळवारी रामबन जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 44 वर अमरनाथ यात्रेच्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसचा ब्रेक निकामी झाला होता. परंतु, भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

बसचे ब्रेक अचानक निकामी झाल्याचे प्रवाशांना कळताच आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी धावत्या बसमधून उड्या मारायला सुरुवात केली. त्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी कसेतरी मार्गात अडथळे आणून बस थांबवली. चालत्या बसमधून उडी मारल्याने काही भाविक जखमी झाले असून, उर्वरित सर्व भाविक सुखरूप आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेक यात्रेकरू धावत्या बसमधून उडी मारताना दिसत आहेत. मात्र, सुरक्षा दलांनी यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळे बस दरीत कोसळण्यापासून बचावली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, काही प्रवाशांनी धावत्या बसमधून खाली उड्या मारल्या. त्यामुळे ते जखमी झाले. त्यानंतर लष्कर, पोलिस आणि वाहतूक पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी बसचा पाठलाग करून बसच्या पुढील व मागील टायरखाली दगड टाकून ती थांबवली. बस थांबली नसती तर ती दरीत पडून मोठा अपघात होण्याची शक्यता होती. सर्व जखमी प्रवासी सुखरूप असून त्यांच्यावर लष्कराच्या छावणीत उपचार करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT