Amarnath Yatra sakal
देश

Amarnath Yatra : ‘अमरनाथ’साठी चार लाख भाविकांची नोंदणी

अमरनाथ यात्रेसाठी देशभरातून यंदा सुमारे चार लाख भाविकांनी नोंदणी केली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

जावेद मात्झी -सकाळ न्यूज नेटवर्क

श्रीनगर - अमरनाथ यात्रेसाठी देशभरातून यंदा सुमारे चार लाख भाविकांनी नोंदणी केली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. सुमारे ५२ दिवसांपर्यंत चालणाऱ्या या यात्रेतील भाविकांची पहिली तुकडी २८ जून रोजी पहाटे अनंतनागमधील भगवती नगर यात्री निवास येथून अमरनाथ गुहेकडे रवाना होणार आहे.

यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्‍मीर पोलिस, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल , राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. अमरनाथ गुहेकडे जाण्यासाठीच्या पहलगाम आणि बालताल या दोन्ही मार्गांवर यात्रेकरूंसाठी ठिकठिकाणी सुमारे १२५ अन्नछत्र उघडण्यात येणार असून त्याची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. लंगरमध्ये काम करणाऱ्या सेवेदारांसह सुमारे सात हजार जण अमरनाथ यात्रेच्या तयारीसाठी अथक परिश्रम घेत आहेत.

जम्मू-काश्‍मीरचे नायब राज्यपाल आणि श्री अमरनाथ देवस्थान मंडळाचे अध्यक्ष मनोज सिन्हा हे अमरनाथ यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी बालताल येथे भेट देणार आहेत.

अतिउच्च दर्जाचे सीसीटीव्ही

अमरनाथ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर उधमपूर ते बनिहाल दरम्यान उच्च क्षमता असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ३६० अंशाच्या कोनात सर्वत्र नजर ठेवणारे असे दहा कॅमेरे राष्ट्रीय महामार्गावर बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून महामार्गावरील अगदी बारीकसारीक हालचालीही टिपता येणार आहेत. यासाठी विशेष नियंत्रण कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे.

अपघात होण्याची शक्यता असणाऱ्या आणि संरक्षणदृष्ट्या अधिक महत्त्वाच्या भागांमध्ये हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. महामार्गावर कोणत्याही वाहनास काही तांत्रिक अडचण आल्यास त्या ठिकाणी तत्काळ पोहोचण्याची व्यवस्था देखील पोलिसांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS 3rd T20I : अर्शदीपने सुरुवात दणक्यात करून दिली, पण सूर्याची रणनीती फसली; टीम डेव्हिड, स्टॉयनिसने वाट लावली

Crime: संतापजनक! आधी २७ दिवसांच्या बाळाला संपवलं, नंतर पत्नीकडून पतीच्या गुप्तांगावर वार, धक्कादायक कारण समोर

Nashik Municipal Election : नाशिक मनपा निवडणूक: नव्या नियमानुसार ओबीसीची एक जागा घटली; सर्वसाधारण खुल्या गटाला फायदा

JEE Main 2026: जेईई-मुख्य परीक्षेसाठी नोंदणी सुरू; जानेवारीतील पहिल्या सत्रासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज

Latest Marathi News Update : चेन स्नॅचिंग करणाऱ्या सराईत इराणी गुन्हेगाराला कल्याण झोन तीन पोलिसांनी ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT