amarnath esakal
देश

अमरनाथ यात्रेसंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, यात्रेकरूंना 5 लाखांचं विमा कवच

अमरनाथ यात्रेसंदर्भात आता एक वेगळी आणि मोठी बातमी समोर येत आहे.

सकाळ डिजिटल टीम

अमरनाथ यात्रेसंदर्भात आता एक वेगळी आणि मोठी बातमी समोर येत आहे.

यंदाची अमरनाथ यात्रा यंदा 30 जूनपासून सुरू होणार आहे. यावेळी अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार असून परंपरेनुसार रक्षाबंधनाच्या दिवशी ती संपणार असल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. अमरनाथ यात्रेसंदर्भात आता एक वेगळी आणि मोठी बातमी समोर येत आहे. या यात्रेसंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना प्रत्येकी ५ लाखांचं विमा कवच देण्याचा निर्णय केंद्राने जाहीर केला आहे. त्यामुळे यात्रेकरुंनी समाधान व्यक्त झाले आहे.

प्रत्येक यात्रेकरूला रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेन्टिफिकेशन अर्थात RFID टॅग दिले जाणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. अमरनाथ यात्रेबाबत घडामोडींचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तीन उच्चस्तरीय बैठका घेतल्या. यापैकी दोन बैठका या यात्रेची सुरक्षा आणि त्यासंदर्भातल्या व्यवस्थेबाबत होत्या तर तिसरी बैठक ही जम्मू-काश्मीरमधील सर्वसाधारण सुरक्षा व्यवस्थेबाबत होती. दरम्यान, कोरोना निर्बंधांमुळे गेले दोन वर्षे यात्रा रद्द करण्यात आली होती. या प्रवासादरम्यान भाविकांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

अमरनाथ यात्रेसाठी येणाऱ्या यात्रेकरूंची ऑनलाइन नोंदणी एप्रिलपासून सुरू झाली आहे. एप्रिलपासून ऑनलाइन प्रक्रियेद्वारे यात्रेसाठी यात्रेकरूंची नोंदणी सुरू करण्याची घोषणा करताना श्राइन बोर्डाने सांगितले की, दक्षिण काश्मीरमधील हिमालयीन प्रदेशातील तीर्थक्षेत्रातील यात्रेकरूंच्या हालचालीसाठी RFID आधारित ट्रॅकिंग केले जाईल. तसेच प्रवासासाठी निवास क्षमता, आरोग्य सुविधा, दूरसंचार सुविधा, हेली सेवा, SASB अॅप, पोनीवालांसाठी वर्षभराचा विमा यासह प्रवासी आणि सेवा प्रदात्यांच्या फायद्यासाठी या वर्षी अनेक अनोखे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

अमरनाथजी श्राइन बोर्डाने अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम ट्रॅक आणि गंदरबल जिल्ह्यातील बालटाल या दोन्ही मार्गांवरून एकाच वेळी यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हेलिकॉप्टरने प्रवास करणाऱ्यांना वगळून दैनंदिन मार्गानुसार यात्रेकरूंची संख्या 10,000 पर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. बोर्डाने प्रवाशांसाठी 2.75 किमी लांबीच्या बालटाल ते डोमेलपर्यंत मोफत बॅटरी कार सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

Latest Marathi News Live Update : स्री बीज तस्करी प्रकरणात नाशिकमधील तीन आयव्हीएफ सेंटर रडारवर

Adani Group: अदानींबरोबर करार मोडला, ७५०० कोटी द्यावे लागणार? राज्याला भुर्दंड, तपासणी नाके बंद करण्यात अदानींच्या अटीचा अडथळा

Fake Currency Kolhapur : कोल्हापूर शहराच्या भरवस्तीत बनावट नोटा विक्रीचा प्रकार, लाखो रुपयांच्या काळाबाजार उघड

Hingoli Traffic Congestion: हिंगोलीकरांची वाहतूक व्यथा: कोंडी, पार्किंग नसणे आणि धूळखात सिग्नल; गांधी चौक ते रिसाला बाजार

SCROLL FOR NEXT