amarnath yatra cloudburst esakal
देश

Amarnath : ढगफुटीतनंतर आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

सकाळ डिजिटल टीम

Amarnath Yatra Cloudburst : अमरनाथ गुहेजवळ ढगफुटीमुळे अनेक लोक पुरात वाहून गेले. या घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे 40 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर बचावकार्य सुरू असून भारतीय लष्कर, एनडीआरएफ, आयटीबीपी, जम्मू-काश्मीर पोलिसांचे पथक बचाव कार्य करत आहेत. दरम्यान. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

अमरनाथ गुहेजवळील ढगफुटीनंतर झालेल्या या घटनेत जखमी झालेल्या लोकांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफचे डीजी अतुल करवाल यांनी सांगितले की, या दुर्घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 40 लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री 4 वाजेपर्यंत बचावकार्य सुरू होते, मात्र पावसामुळे ते अर्धवटच थांबवावे लागल्याचे त्यांनी सांगितले. आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बचावकार्य पुन्हा सुरू करण्यात आले. लष्कराच्या MI-17 हेलिकॉप्टरच्या मदतीने आतापर्यंत 8 जणांचे मृतदेह श्रीनगरला नेण्यात आले आहेत.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार पुराच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या सैनिक आणि नागरिकांचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून विशेष वॉल पेनिट्रेशन रडार ((Wall Penetration Radar)चा वापर केला जात आहे. या रडारचा वापर लष्कराकडून दहशतवादविरोधी कारवायांमध्ये घर आणि भिंतींच्या मागे दहशतवाद्यांची जागा शोधण्यासाठी केला जातो. हे रडार भिंतीच्या मागे स्थिर आणि हलणारे लक्ष्य शोधू शकते. या रडारचा वापर ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी केला जात आहे.

काल संध्याकाळी अचानक आलेल्या पुरामुळे अमरणाथ येथे अडकून पडलेल्या बहुतांश प्रवाशांना पंजरणी येथे हलवण्यात आले आहे. ITBP ने पविक्ष गुहा ते पंजतरणी पर्यंत आपले मार्ग आणि सुरक्षा पथके वाढवली होती. पहाटे 3.30 वाजेपर्यंत प्रवाशांना सुखरूप पंजतर्णीवर हलविण्याचे काम सुरू होते. आतापर्यंत सुमारे 15 हजार लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT