amazon Esakal
देश

ED ने चौकशीच्या नावावर छळ केला; Amazon ची न्यायालयात याचिका

भारताच्या कायद्यानुसार ईडीला ती माहिती मिळवण्याचा कोणताही अधिकार नाही असंही याचिकेत म्हटलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारताच्या कायद्यानुसार ईडीला ती माहिती मिळवण्याचा कोणताही अधिकार नाही असंही याचिकेत म्हटलं आहे.

दिल्ली - ऑनलाइन डिलिव्हरी कंपनी अमेझॉनने (Amazon) सक्तवसुली संचालनालय (ED) विरोधात याचिका दाखल केली आहे. २०१९ मध्ये कंपनीविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका रद्द करण्यासंदर्भात ही याचिका आहे. ईडीने गेल्या काही महिन्यांपासून फ्युचर ग्रुपमध्ये (Future Group) परदेशी गुंतवणूक कायद्याच्या उल्लंघनाचे कारण देत अमेझॉनच्या २०० मिलियन डॉलरच्या गुंतवणुकीची चौकशी सुरु केली आहे.

फ्युचर ग्रुपमधील गुंतवणूक आता कायद्याच्या लढाईत अडकून पडली आहे. फ्युचर ग्रुपने कराराच्या नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप अॅमेझॉनने केला आहे. फ्युचर ग्रुपने व्यापारी प्रतिस्पर्ध्याप्रमाणे नियमांचे उल्लंघन केले असे अमेझॉनने म्हटले आहे. तसंच अमेझॉनने ईडीकडून केल्या जाणाऱ्या चौकशीला अनावश्यक म्हटलं. ईडीने त्यांच्या विशेषाधिकाराचा वापर करून माहिती घेतली जी फ्युचर ग्रुपच्या व्यवहाराशी संबंधित नव्हती असेही अॅमेझॉनने सांगितले.

न्यायालयत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत अॅमेझॉनने म्हटले की, त्यांची कंपनीच्या भारतातील प्रमुख आणि इतर कर्मचाऱ्यांचा चौकशीच्या नावावर ईडीने छळ केला. ईडीने मिळवलेली माहिती नियमांच्या विरोधात आहे. भारताच्या कायद्यानुसार ईडीला ती माहिती मिळवण्याचा कोणताही अधिकार नाही असंही याचिकेत म्हटलं आहे. ईडीची चौकशी अनावश्यक आणि त्रास देणारी असून ती रोखण्याची मागणी त्यांनी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे भाव कोसळले! सलग चौथ्या दिवशी मोठी घसरण; तुमच्या शहरात आता किती भाव?

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

Karad Encroachment : कऱ्हाडच्या वारुंजी फाट्यावर पहाटे अतिक्रमणावर हातोडा; महामार्गालगतची सहा व्यावसायिक खोकी जेसीबीने जमीनदोस्त

Marathi News Live Updates: ९० कोटींच्या रस्ता निविदेवरून आमदाराचा महापालिका आयुक्तांना धमकीचा आरोप; ठेकेदाराच्या पात्रतेवरून नेमका काय घडला वाद?

Divya Mittal IAS Resignation : आयएएस पदाचा राजीनामा, आता राजकारणात एंट्री; दिव्या मित्तल यांची मोठी घोषणा, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT