Amazon staff laid off Ten thousand jobs reduced notices to 260 employee sakal
देश

Amazon staff laid off : अॅमेझॉनमधील कपातीला सुरुवात

मंदीचे संकट : दहा हजार नोकऱ्या कमी होणार, २६० जणांना नोटिसा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ट्विटर, मेटामधील कर्मचारी कपातीनंतर ईकॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅमेझॉननेही कर्मचारी कपातीला सुरूवात केली आहे. कंपनीने कॅलिफोर्नियामधील अधिकाऱ्यांना डेटा वैज्ञानिक, सॉफ्टवेअर अभियंते आणि इतर विभागांमधील सुमारे २६० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे आदेश दिले आहेत. व्यवसायातील मंद वाढ आणि ढासळत्या अर्थव्यवस्थेमुळे कंपनीच्या महसुलात आणि नफ्यात मोठी घट झाली आहे. त्यामुळे खर्चात कपात करण्यासाठी कंपनीने तब्बल १० हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. त्याची सुरवात आजपासून झाली. कंपनीच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी कपात आहे.जवळपास तीन टक्के मनुष्यबळ कमी करण्यात येत आहे. यापूर्वी २०१८ व २००१ मध्ये कर्मचारी कपात केली होती.

आता नोटीस पाठवण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा १७ जानेवारीपासून संपुष्टात येईल. कॅलिफोर्नियातील कामगार कायद्यानुसार, कंपन्यांना एकावेळी ७५ किंवा त्यापेक्षा अधिक पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळ कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना ६० दिवस आधी सूचना देणे आवश्यक आहे. अनेक आढाव्यानंतर आता काही पदांची गरज नसल्याचे आढळले आहे, तर काही जबाबदाऱ्यांचे एकत्रीकरण केले जात आहे. चांगल्या कर्मचाऱ्यांना कंपनी मुकणार आहे, याचे कंपनीला दुःख आहे, असे कंपनीच्या प्रवक्त्या केली टेल यांनी म्हटले आहे.कर्मचाऱ्यांना नवी नोकरी मिळण्यासाठी कंपनी मदत करेल, तसेच चांगली आर्थिक भरपाई देईल, असे उपाध्यक्ष डेव्हिड लंप यांनी म्हटले आहे.

भारतीय कर्मचारी संकटात

अॅमेझॉनच्या अमेरिकेतील विविध कार्यालयांमध्ये असलेल्या अनेक भारतीय कर्मचाऱ्यांनाही कामावरून कमी केल्याची नोटीस मिळाली आहे. यातील बहुसंख्य तरुण कर्मचारी एच-वन बी व्हिसावर असल्याने आता नवी नोकरी शोधण्यासाठी त्यांना फार कमी अवधी मिळणार आहे. लवकर नोकरी न मिळाल्यास त्यांना भारतात परत यावे लागेल. त्यामुळे हे कर्मचारी चिंतित असून लवकरात लवकर नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेकांनी नोकरीची संधी देण्याची विनंती करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : डोनाल्ड ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी आतुर ! अमेरिकेने इराणला पाठवला १५ कलमी शांतता प्रस्ताव, काय आहेत अटी ?

Latest Marathi News Live Update : हडपसर परिसरातील कालवा फुटी प्रकरणी जलसंपदामंत्र्यांकडून अभियंत्यांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेल सहा हजार, सिलिंडर बाराशेच! हिशेब जुळेना ; पथके करतात तरी काय?

Ashok Kharat Case Update : अशोक खरात प्रकरणी उपजिल्हाधिकाऱ्यावर मोठी कारवाई, प्रशासनात खळबळ !

Chhatrapati Sambhajinagar:अयोध्येच्या मंदिराची प्रतिकृती शहरात; धार्मिक वातावरणाची निर्मिती

SCROLL FOR NEXT