Ambika Soni
Ambika Soni 
देश

अंबिका सोनींनी नाकारली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची!

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? याकडे सर्वांच लक्ष लागून राहिलं आहे. त्यातच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांच्याकडे पंजाबचं मुख्यमंत्रीपद सोपवण्याचा निर्णय हायकमांडनं घेतला होता. मात्र, सोनी यांनी मुख्यमंत्रीपदाची ऑफर नाकारल्याचं सूत्रांकडून कळतंय. अंबिका सोनी या ५० वर्षांपासून राजकारणात आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर दोन नावं सर्वात पुढे होती. यामध्ये अंबिका सोनी आणि सुनील जाखड यांच्या नावाची चर्चा होती. पण नवज्योतसिंग सिद्धू यांच्या गटाकडून सुनील जाखड यांच्या नावावर आक्षेप घेण्यात आल्यानं अंबिका सोनी यांचं मुख्यमंत्री होणं निश्चित मानलं जात होतं. पण त्यांनी ही ऑफर नाकारली आहे.

मुख्यमंत्रीपद नाकारण्यामागचं सांगितलं कारण

अंबिका सोनी यांनी मुख्यमंत्रीपद न स्विकारण्याचं कारण काँग्रेस हायकमांडला कळवलं आहे. त्यांनी म्हटलंय की, याक्षणी आपण मुख्यमंत्री होऊ इच्छित नाही. कारण मी खत्री हिंदू समाजातून आहे. पंजाबचा मुख्यमंत्री हा शीख व्यक्तीच व्यायला हवा. पंजाबमध्ये शीख नाही तर दुसरं कोण असेल? आपण पक्षाशी प्रामाणिक असून पक्षाचा निर्णयाचा सन्मान करते. पण आपण मुख्यमंत्रीपद सांभाळू इच्छित नाही, असंही अंबिका सोनी यांनी म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

Video: PM मोदींना जिरेटोप घातल्याने वाद पेटला! संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार गट आक्रमक

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT