देश

वृद्ध आई-बापाची सेवा न करणाऱ्याची खैर नाही; लवकरच येतोय कायदा

सकाळन्यूजनेटवर्क

संपत्ती घेतल्यनंतरही वृद्ध आई-वडिलांची सेवा न करणाऱ्या आपत्यांचं आता काही खरं नाही. कारण लवकरच नवीन कायदा येतोय. होय! उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार, आई-वडिलांची सेवा न करणाऱ्या आपत्यांना अद्दल घवण्यासाठी नवीन कायदा  घेऊन येत आहे. कायदा पारित झाल्यानंतर आई-वडिलांची सेवा न करणाऱ्यांची संपत्ती माघारी घेतली जाणार आहे. उत्तर प्रदेश स्टेट लॉ कमिशन (UPSLC) ने शुक्रवारी याबाबतचा एक प्रस्ताव मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सोपवला आहे.  

UPSLC ने आपल्या प्रस्तावात आई-बाप तथा वरिष्ठ नागरिकांच्या पालण-पोषण कायदा 2007' मधील संशोधनावर प्रस्ताव दिला आहे. प्रस्तावात असेही म्हटेलय की, एखाद्या वृद्ध व्यक्तीनं तक्रार केल्यास आई-वडिलांकडून आपत्य अथवा वारिस यांना मिळालेली संपत्ती माघारी घेतली जाऊ शकते. 

जर मुलगा किंवा नातेवाइक वृद्ध व्यक्तीच्या घरात राहात असेल अन् त्यांची सेवा करत नसेल तसेच दुर्भाग्यपूर्ण व्यवहार करत असेल. तर अशा व्यक्तींना घरातून बाहेर काढता येईल.  UPSLC ने कायद्याचा अभ्यास केल्यानंर हा रिपोर्ट तयार केला आहे.  UPSLC ने आपल्या रिपोर्टमध्ये असेही सांगितलेय की, अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यामध्ये मुलं आपल्या आई-बापाच्या संपत्तीवर कब्जा करता. तसेच आई-वडिलांसोबत चुकीचा व्यवहार करतात.  

दरम्यान, UPSLC नं योगी आदिनाथ यांच्याकडे पाठवलेल्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. पण जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास आई-वडिलांची सेवा न करणाऱ्यांना संपत्तीतून बेदखल करण्यात येऊ शकतं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Brothers Morcha : निवडणूक आयोगाविरोधात आज ठाकरे बंधूंचा महामोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेतेही सहभागी होण्याची शक्यता, मोर्चा कधी अन् कुठून निघणार?

Pusad Excise Constable Attack : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला लाच मागितल्याच्या वादातून मारहाण; आरोपी अटकेत

Latest Marathi News Live Update : मोर्चासाठी ठाण्यातून शिवसैनिक-मनसैनिक मुंबईकडे रवाना

Samruddhi Expressway Accident : समृद्धीवर पुन्हा भीषण अपघात १७ जण जखमी ; पीकअपचा टायर निघाल्याने वाहन उलटले

Konkan Water: कोकणचे पाणी घाटमाथ्यावर आणणे शक्य : प्रफुल्ल कदम; ‘वॉटर लिंक टनेल्स’ उभा करण्याचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT