Thackeray brothers morcha against Election Commission
esakal
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुढाकाराने आज (रविवारी) मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘मतदारांच्या मतांचा अपमान करणाऱ्यांच्या विरोधात गर्जना’ या भूमिकेतून ठाकरे बंधूंनी नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले (Thackeray Brothers Morcha) आहे. मेट्रो सिनेमा ते मुंबई महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात येणार असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेतेही यात सहभागी होण्याची शक्यता आहे.