Patanjali Apology  sakal
देश

Patanjali Apology : पतंजलीच्या माफीनाम्यात सुधारणा!

दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल माफीनाम्यामध्ये ‘पतंजली आयुर्वेद’ने आपले सहसंस्थापक रामदेवबाबा यांच्या नावाचा उल्लेख केल्याची दखल आज सर्वोच्च न्यायालयाने घेतली. यासंदर्भात लक्षणीय प्रगती झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबद्दल माफीनाम्यामध्ये ‘पतंजली आयुर्वेद’ने आपले सहसंस्थापक रामदेवबाबा यांच्या नावाचा उल्लेख केल्याची दखल आज सर्वोच्च न्यायालयाने घेतली. यासंदर्भात लक्षणीय प्रगती झाली आहे.

यापूर्वी केवळ पतंजली असा उल्लेख होत होता. आता त्यात नावे आहेत, आम्ही हे स्वीकारतो. असे न्यायाधीश हिमा कोहली आणि न्या. अहसनुद्दीन अमानुल्ला यांच्या खंडपीठाने पंतजलीचा माफीनामा तपासल्यानंतर सांगितले.

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) अध्यक्ष आर. व्ही. अशोकन यांनी केलेल्या टिपण्यांबद्दलही खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. पतंजलीची बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर ही मुलाखत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने त्यांना दिले. सर्वोच्च न्यायालयाने आयएमए आणि खासगी डॉक्टरांच्या प्रॅक्टिसवर टीका करणे, दुर्देवी असल्याची टिपणी अशोकन यांनी केली होती. तुम्ही एक बोट पतंजलीकडे दाखविता तेव्हा चार बोटे आयएमएकडे निर्देश करतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले होते.

निष्क्रियतेबद्दल ताशेरे

पतंजली आयुर्वेद लि.च्या जाहिरात प्रकरणातील निष्क्रियतेबद्दल उत्तराखंड राज्य परवाना प्राधिकरणावर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. ‘तुम्हाला सहानुभूती हवी असेल तर प्रामाणिक राहा’, असेही न्यायालयाने प्राधिकरणाला सुनावले. प्राधिकरणाच्या स्पष्टीकरणावर न्यायालयाने असंतोष व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जवसुलीबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे, RBIची कठोर नियमावली जारी

Tukaram Mundhe: ‘आयएएस’ झाल्‍यानंतर ठरवलेलं ध्येय ओळख देतं; अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्‍त तुकाराम मुंढे यांची भावना

घरात ठेवा ही एक छोटीशी वस्तू; नशीब पालटेल, अनुष्का शर्माच्या यशामागेही आहे खास कनेक्शन!

Marathi News Live Updates : पुण्यात प्रसिद्ध पबवर पोलिसांची पहाटे धाड, ८०हून अधिक तरुण तरुणी ताब्यात

Car Accident News : LPG सिलिंडरच्या ट्रकला कारची धडक, तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

SCROLL FOR NEXT