Tejas fighter jet DRDO
देश

अमेरिका-इजिप्तलाही ‘तेजस’च्या खरेदीत रस

संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी ही माहिती दिली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ या लढाऊ विमानांची खरेदी करण्याची मलेशियाने तयारी दर्शविली असतानाच अमेरिकेसह सहा देशांनीही या विमानाच्या खरेदीत रस दाखविला आहे. संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी ही माहिती दिली.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स (एचएएल) या कंपनीने तेजस हे बहुउद्देशीय लढाऊ विमान तयार केले आहे. हवाई हल्ल्यांचा धोका असताना हे विमान उत्तम कामगिरी करू शकते. ‘एचएएल’कडून ८३ तेजस विमाने खरेदी करण्यासाठी भारत सरकारने त्यांच्याबरोबर गेल्या वर्षी ४८ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. या विमानाच्या खरेदीसाठी मलेशियाने तयारी दर्शविली असून त्याबाबत बोलणीही सुरु केली आहे. आता, अमेरिका, ऑस्ट्रेलया, इंडोनेशिया, फिलिपीन्स, अर्जेंटीना आणि इजिप्त या सहा देशांनीही ‘तेजस’च्या खरेदीमध्ये रस दाखविला असल्याचे अजय भट यांनी सांगितले.

मलेशियाने २०१९ मध्ये ‘तेजस’ची माहिती मागविली होती. मलेशियाकडे सध्या रशियन बनावटीच्या मिग-२९ विमानांचा ताफा आहे. ही विमाने जुनी झाल्याने त्यांच्या जागी नवी विमाने ते घेणार आहेत. मलेशिया भारताकडून किती ‘तेजस’ विमाने खरेदी करणार, हे जाहीर करण्यात आलेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

Satana Wedding Drama: बोहल्यावर नवरीचा ठाम नकार; वरात थेट सटाणा पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT