Corona Vaccination esakal
देश

भारतात लवकरच मिळू शकते सिंगल डोस लस; जॉन्सनने मागितली मंजुरी

सकाळ डिजिटल टीम

सध्या भारतात देण्यात येत असलेल्या कोव्हॅक्सिन, कोविशील्ड आणि स्पुटनिक व्ही लशीचे दोन डोस दिले जातात.

वॉशिंग्टन - अमेरिकन फार्मा कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात कोरोना प्रतिबंधक सिंगल डोसच्या लसीसाठी परवानगी मागितली आहे. सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनला परवानगी दिल्यास ही चौथी लस असणार आहे. सध्या भारतात कोरोनाला रोखण्यासाठी सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत तीन लशींचा वापर केला जात आहे. यामध्ये कोव्हॅक्सिन, कोविशील्ड आणि रशियन स्पुटनिक व्ही लशीचा समावेश आहे.

कोव्हॅक्सिन, कोविशील्ड आणि स्पुटनिक व्ही लशीचे दोन डोस दिले जातात. आतापर्यंत या लशींचा वापर करून देशातील जवळपास 50 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. जर जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीला परवानगी मिळाली तर भारतात सिंगल डोसची ही पहिली लस असेल.

जॉन्सन अँड जॉन्सनने याआधी सोमवारी म्हटलं होतं की, भारतात सिंगल डोसची लस लाँच करण्यासाठी आम्ही तयार आहे. यासाठी भारत सरकारसोबत चर्चा सुरु असून मंजुरी मिळेल अशी आशा आहे. जॉन्सन अँड जॉन्सनने पाच ऑगस्टला भारत सरकारकडे लशीला मंजुरी मिळावी यासाठी अर्ज केला आहे.

जॉन्सन अँड जॉन्सनला परवानगी मिळाल्यास तो एक मैलाचा दगड ठरणार आहे. बायोलॉजिकल ई लिमिटेडच्या सहकार्याने भारतातील लोकांसह जगातील इतर नागरिकांना कोरोना लशीचा पुरवठा करते. बायोलॉजिकल ई जगाला लशीचा पुरवठा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यांच्याकडूनच जॉन्सन अँड जॉन्सनला कोरोना लशींच्या पुरवठ्यासाठी मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

Sangli Crime: वेदांत बंडगर खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार निलेश गडदे कर्नाटक सीमेजवळ लॉजवर मैत्रिणीसह अटक; एलसीबीची धडक कारवाई

Pune Nashik High Speed: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मूळ आराखड्यानुसारच; जीएमआरटी अडथळा नसल्याचा तज्ज्ञांचा निष्कर्ष

मोठी बातमी! वैभव सूर्यवंशीला सरावादरम्यान दुखापत; प्रॅक्टिस अर्धवट सोडून बाहेर पडला, श्रीलंका ए विरुद्धचा सामना खेळणार का?

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

SCROLL FOR NEXT