Amit Khare 
देश

अमित खरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवे सल्लागार

लालू प्रसाद यांची जेलवारी घडवणारं चारा घोटाळा प्रकरण त्यांनीच उघड केलं होतं

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून माहिती व नभोवाणी मंत्रालयाचे माजी सचिव अमित खरे यांची मंगळवारी नियुक्ती झाली. उच्च शिक्षण सचिव पदावरून ते ३० सप्टेंबरला निवृत्त झाले आहेत. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने खरे यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. यासंबंधीचा आदेश आज जारी करण्यात आला. त्यांची ही नियुक्ती कंत्राटी पद्धतीवर केली असून त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल किंवा पुढील आदेश येईपर्यंत ते या पदावर असतील, असे आदेशात म्हटले आहे.

चारा घोटाळा प्रकरण काढलं होतं बाहेर

अमित खरे हे भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) १९८५च्या तुकडीतील झारखंड कॅडरचे निवृत्त अधिकारी आहेत. सुमारे ३६ वर्षांच्या सेवेत त्यांनी केंद्र सरकारसह झारखंड आणि बिहार सरकारच्या प्रशासनात जबाबदारीची पदे भूषविली आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव शिक्षा भोगत असलेले चारा गैरव्यवहाराचे प्रकरण खरे यांनीच उघडकीस आणले होते. चाईबासाचे उपायुक्त असताना त्यांनी या प्रकरणी प्रथमच ‘एफआयआर’ची नोंद केली होती.

नव्या शैक्षणिक धोरणात सक्रिय भूमिका

अत्यंत कार्यक्षम अधिकारी अशी ओळख असलेल्या खरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशात ३४ वर्षांत नवे शैक्षणिक धोरण तयार करण्यात सक्रिय भूमिका होती. त्याचबरोबर डिजिटल मीडिया संबंधित नियमांत महत्त्वाचे बदल करण्‍यातही त्यांचा हातभार लागलेला आहे. माजी कॅबिनेट सचिव पी. के. सिन्हा आणि माजी सचिव या पंतप्रधानांच्या सल्लागारांनी यंदा पदभार सोडल्याने खरे यांची नियुक्ती झाली आहे. अत्यंत पारदर्शपणे व ठामपणे निर्णय घेणे हे त्यांचे वैशिष्ट मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT