amit shah  
देश

निवडणुकीपर्यंत तृणमूलमध्ये एकट्या ममतादिदी राहतील; अमित शहांची बोचरी टीका

सकाळन्यूजनेटवर्क

कोलकाता- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेसचे बंडखोर आमदार सुवेंदू अधिकारी यांचे भाजपमध्ये स्वागत केले. पश्चिम बंगालच्या मिदनापूरमधील भव्य रॅलीदरम्यान अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मोठ्या संख्येने लोक तृणमूल काँग्रेस का सोडत आहेत? लोक ममतांच्या अव्यवस्थेला, भ्रष्टाचाराला आणि नेपोटीझमला कंटाळले आहेत. दिदी, ही केवळ सुरुवात आहे. निवडणूक येईपर्यंत तुम्ही एकट्या पक्षात राहतात, अशी बोचरी टीका अमित शहा यांनी केली. 

दूवेंदू अधिकारी यांनी 27 नोव्हेंबर रोजी कॅबीनेटमधून राजीनामा दिला होता. त्यानंतर 16 डिसेंबरला त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. अधिकारी यांच्या सहकाऱ्यांनी बंगालच्या राजकारमध्ये मोठी त्सुनामी येणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ममता बँनर्जी यांना भविष्यात अनेक धक्के बसवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापत आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या अनेक आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामुळे टीएमसीमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. हे बंडखोर नेते भाजपमध्ये सामिल होणार असल्याचीच दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये भाजपचे नेते आणि मंत्र्यांचे सातत्याने दौरे होत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. ते राज्यातील भाजपच्या नेत्यांसोबत पक्षाच्या हालहवाल्यावर चर्चा करणार आहेत. या दौऱ्यांद्वारे ते भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवून येऊ घातलेल्या निवडणुकांसाठी पार्श्वभूमी तयार करत असल्याचं बोललं जातंय.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय आणि भाजपाचे प्रमुख दिलीप घोष यांनी मिदनापुर जिल्ह्यातील बेलीजुरी गावातील एका शेतकऱ्याच्या घरी आज दुपारी जेवण केलं. यानंतर अमित शहा मिदनापुरमधील कॉलेज मैदानात आयोजित जनसभेला संबोधित करणार आहेत. तसेच आज गृहमंत्री अमित शहा यांनी मिदनापुरमधील सिद्धेश्वरी काली मंदिरात पुजा केली. यादरम्यान त्यांच्यासोबत बंगाल भाजपाचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासहित अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

शहा म्हणाले
-लोकसभेवेळी भाजप अठरा जागांवर विजयी
-ममतांना दहा कोटी बंगालींचे भवितव्य दिसत नाही
-केंद्राचा निधी राज्यातील जनतेपर्यंत पोचत नाही
-ममतांनी केंद्राचा निधी लोकांपर्यंत पोचण्यापासून रोखला
-भाजप विधानसभेच्या दोनशेपेक्षा अधिक जागा जिंकेल
-वादळ पीडितांसाठी केंद्राने दिलेला निधी गुंडांकडे गेला
-ममतांच्या हिंसाचाराला भाजप तितक्याच तीव्रतेने उत्तर देईल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

अमृता खानविलकरच्या 'अमूल्य'मध्ये कोणत्या साड्या आहेत? सगळ्यात स्वस्त साडी किती हजाराची?

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

SCROLL FOR NEXT