Amit Shah Admitted To AIIMS For Post-Covid Care Discharged 
देश

गृहमंत्री अमित शहांना रुग्णालयातून डिस्चार्ज

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : गृहमंत्री अमित शाह यांना अखेर रुग्णालयांतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहा दिल्लीच्या  एम्स (AIIMS) रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांना तेथून डिस्चार्ज (HM Amit Shah Discharged) देण्यात आला आहे. गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. परंतु, त्यानंतर ते पोस्ट कोविड केयर (Post Covid Care)साठी रुग्णालयात भरती झाले होते.

आज (ता. ३१) सोमवारी अमित शहा यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमित शहा यांचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली होती. परंतु, कोरोनावर मात केल्यानंतरही त्यांना काही प्रमाणात त्रास जाणवत होता, म्हणून त्यांना दिल्लीतील एम्स AIIMS रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

अमित शहा यांना १७ ऑगस्ट रोजी एम्समध्ये भरती करण्यात आले होते. त्याआधी ३-४ दिवसांपासून त्यांना थकवा आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. त्याआधी २ ऑगस्टला माहिती मिळाली होती की, त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतः ही माहिती ट्विट करुन दिली होती. त्यानंतर १४ ऑगस्ट रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले होते.

दरम्यान, कोरोनाचाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही काही रुग्णांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे डॉक्टर कोरोना चाचणी अहवाल आल्यानंतरही रुग्णांना काळजी घेण्यास सांगत आहेत. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानतंरही लोकांना खोकला, अंगदुखी, डोकेदुखी आणि ऑक्सिजन लेवल कमी होण्यासारखे त्रास होताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Conflict : इराणचा युद्धबंदीच्या चर्चांना नकार ! अमेरिकेला ठाम इशारा – गरज असेपर्यंत युद्ध सुरूच राहणार

Islapur Fire Incident: ईस्लापूरमध्ये भीषण आग; हॉटेल, हार्डवेअर व शूज सेंटरचे लाखोंचे नुकसान

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Nashik Sharda Sanman: शारदानगरमध्ये ‘शारदा सन्मान पत्र’ प्रदान; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; कल्याण पाचांगणे

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT