mamata sakal
देश

"हल्ल्यांमागे गृहमंत्री शहा"; ममतांचा आरोप

भाजपशासित त्रिपुरात स्वतंत्र घटनांत अभिषेक बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : तृणमूल काँग्रेसचे (TMC) राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी व पक्षाच्या कार्यकर्त्यांवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) जबाबदार असल्याचा थेट आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banrjee) यांनी केला. अशा हल्ल्यांपुढे झुकणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. अभिषेक बॅनर्जी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आहेत. (Amit Shah behind attacks on TMC leaders in Tripura Mamata banrajee)

भाजपशासित त्रिपुरात स्वतंत्र घटनांत अभिषेक बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या विद्यार्थी कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आले. त्रिपुरात २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असून त्यादृष्टीने तृणमूल राज्यात विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी कोलकत्यातील ‘एसएसकेएम’ शासकीय रुग्णालयात तृणमूलच्या जखमी कार्यकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. त्यानंतर त्या म्हणाल्या, की भाजप आपली सत्ता असलेल्या त्रिपुरा, आसाम, उत्तर प्रदेश व इतर राज्यांत अराजकपणे सरकार चालवीत आहे. त्रिपुरात अभिषेक बॅनर्जी व तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सक्रिय पाठिंब्याशिवाय असे हल्ले घडविणे शक्य नाही.

त्रिपुरा पोलिसांच्या समोरच हे हल्ले करण्यात आले आणि पोलिसांनी मूक प्रेक्षकाची भूमिका घेतली. या हल्ल्यांमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचाच हात आहे. त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांमध्ये हल्ल्यांच्या चौकशीचा आदेश देण्याचे धैर्य नाही.

- ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, पश्चिम बंगाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT