Amit Shah Narendra Modi Sakal
देश

PM नरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी माझ्यावर दबाव, अमित शाहांचा मोठा खुलासा

एका खोट्या गुन्हात नरेंद्र मोदींना अडकवण्याचा कसा डाव होता यावर त्यांनी गौप्यस्फोट केला

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधी यांचं सदस्यत्व रद्द झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी यावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप केले असून काँग्रेसने केंद्रीय एजन्सीचा कसा गैरवापर केला, एका खोट्या गुन्हात नरेंद्र मोदींना अडकवण्याचा कसा डाव होता याबाबतही अमित शाह यांनी गौप्यस्फोट केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका कार्यक्रमात बोलताना सांगितले की, तपास एजन्सी त्यांची चौकशी करत असताना सीबीआय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमधील एका कथित बनावट चकमक प्रकरणात अडकवण्यासाठी अमित शाह यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळातील ही घटना असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

एकीकडे देशात केंद्रीय यंत्रणाचा वापर विरोधी पक्षातील नेत्यांना अडकवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप होत असतानाच नरेंद्र मोदी सरकार त्यांना अडकवण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा “दुरुपयोग” करत होता असा गंभीर आरोप गृहमंत्री अमित शाह यांनी ‘न्यूज 18 रायझिंग इंडिया’ या कार्यक्रमात बोलताना केला आहे. यावेळी अमित शाह यांनी विरोधक कोणत्या थराला जाऊन हे सगळं करत होते याबद्दलदेखील भाष्य केलं आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात कथित बनावट चकमक प्रकरणात नरेंद्र मोदी यांना अडकवण्यासाठी सीबीआय माझ्यावर दबाव आणत होती असा आरोप त्यांनी केला. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. तुम्ही टेन्शन घेऊन नका तुम्ही नरेंद्र मोदींचं नाव सांगून टाका असं त्यावेळी मला सांगण्यात आलं होतं. त्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात होता असं अमित शाह यावेळी म्हणाले.

तर पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, राहुल गांधींनी अजूनही या निकालाला आव्हान दिलेलं नाही, त्यांच्यात कोणता अहंकार आहे? लालू प्रसाद यादव, जयललिता, राशिद अल्वी यांच्यासह 17 जणांची खासदारकी गेली. पण कुणीही काळे कपडे घातले नाहीत. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे. देशाच्या एका व्यक्तीसाठी कायदा बदलायचा का? असा सवाल अमित शाह यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: अयोध्येत राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न! विश्वस्त मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेत होणार मोठे बदल

विरोधात उभा रहायची हिंमत कशी केलीत? पिंपरीत भाजप कार्यकर्त्यांचा मध्यरात्री राडा, घरात घुसून शिवीगाळ

ताजमहालचे खास तळघर उघडणार! मोफत पाहण्याची एकमेव संधी; जाणून घ्या ३ दिवसांचे वेळापत्रक

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Latest Marathi News Live Update : सटाण्यात अनैतिक मानवी व्यापाराचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT