home minister amit shah  esakal
देश

Amit Shah : ''CAA ला कोणीही रोखू शकत नाही'' पश्चिम बंगालमध्ये जावून अमित शाहांनी स्पष्ट केली भूमिका

सकाळ न्यूज नेटवर्क ः शामल रॉय

कोलकताः देशामध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याची (सीएए) अंमलबजावणी करण्यापासून केंद्र सरकारला कोणीही रोखू शकत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी सभेत बोलताना केले. तृणमूल काँग्रेसवर टीका करताना त्यांनी राज्य सरकार हे लांगूलचालनाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला तसेच पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला सत्तेत आणण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

शहा म्हणाले, ‘‘ नागरिकत्व कायदा हा देशाचा कायदा असून केंद्र सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याची अंमलबजावणी करेल. त्याची अंमलबजावणी करण्यापासून कुणीही आम्हाला रोखू शकत नाही.’’

राज्यातील राजकीय हिंसाचार, भ्रष्टाचार आणि लांगूलचालनाच्या राजकारणावर प्रहार करताना ते म्हणाले, ‘‘ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालला उद्‍ध्वस्त केले आहे.’’ ‘‘ सोनार बांगला’ अन् ‘मा माटी मानूष’ याचे आश्वासन देताना ममतादीदींना कम्युनिस्टांना सत्तेतून बाहेर फेकले होते. पण हे सत्तांतर होऊन देखील राज्यात बदल झाला नाही. आजही राज्यामध्ये घुसखोरीचे प्रकार, लांगूलचालनाचे राजकारण आणि राजकीय हिंसाचार हे सगळे होतेच आहे. डाव्यांनी २७ वर्षे बंगालवर राज्य केले होते. ममतांनाही सलग तिसऱ्यांदा राज्याची सत्ता मिळाली पण त्यांनी राज्याची वाट लावली. राज्यातील घुसखोरी ममतांना रोखता आलेली नाही. घुसखोरांना उघडपणे मतदार ओळखपत्रे आणि आधार कार्डांचे वाटप केले जात आहे. हे डोळ्यासमोर घडत असताना मुख्यमंत्री मात्र शांत आहेत,’’ असे शहा म्हणाले.

जनता बदला घेईल

‘‘ राज्यात २०२६ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपच्या अनेक नेत्यांच्या हत्या झाल्या होत्या, राज्यातील जनता आता हत्येचा बदला घेईल. बंगालमध्ये निवडणुकीच्या काळात सर्वाधिक हिंसाचार होतो. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांच्याही हत्या झाल्या आहेत. आता २०२६ मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत राज्यातील जनता या सगळ्याचा बदला घेईल,’’ असे शहा यांनी सांगितले.

डावा कट्टरतावाद संपविला

केंद्रातील भाजपचे सरकार राज्यातील लोकांसाठी मोठा निधी पाठवते पण तृणमूलची सिंडिकेट हा निधी त्यांच्यापर्यंत पोचू देत नाही. पंतप्रधान मोदींनी अवघ्या देशातून दहशतवादाचे उच्चाटन केले असून जम्मू- काश्मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम हटविण्याचे काम त्यांनीच केले आहे. देशातून डावा कट्टरतावाद संपुष्टात आला असल्याचे शहा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT