Amit Shah  sakal
देश

Live मुलाखतीतच अमित शाह म्हणाले, "..हा बोलण्याचा विषय नाही"

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरील गुजरात दंगल आणि गोध्रा हत्याकांडाबद्दल मुलाखत सुरू होती.

सकाळ डिजिटल टीम

गुजरातमधल्या दंगली या राजकीय हेतूने प्रेरित होत्या, असं सांगत अमित शाह यांनी एका लाईव्ह मुलाखतीत आपल्यावरच्या आरोपांबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुजरात दंगल प्रकरणात लागलेल्या आरोपांबद्दलही भाष्य केलं आहे. पण या लाईव्ह मुलाखतीत एक असा विषय झाला, ज्यामुळे त्यांनी मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराला मधेच थांबवलं आणि थेट विषयच बदलला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरात दंगल प्रकरणात मिळालेली क्लिनचिट कायम राहिली आहे. नुकतंच क्लिनचिट विरोधात दाखल कऱण्यात आलेल्या याचिकेत न्यायालयाने मोदींच्या बाजूने निर्णय दिला आहे. या सगळ्या संदर्भात ही मुलाखत सुरू होती. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर लावले गेलेले आरोप खोटे होते, त्यांच्या बदनामीसाठी करण्यात आले होते, असं अमित शाहांनी स्पष्ट केलं. त्यामागची कारणं आणि त्या वेळच्या परिस्थितीबद्दलही माहिती दिली.

पुढे विषय गोध्रा हत्याकांडाकडे वळला. या हत्याकांडामध्ये मृतदेहाची परेड करण्यात आली, या आरोपाबद्दलही विचारण्यात आलं. त्यावेळी हे आरोप अमित शाह यांनी फेटाळले आहेत. या हत्याकांडाबद्दल अनेक ठिकाणी चर्चा झाल्या, आधीही मोदींना क्लिनचिट मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. मला त्यावेळी जेलमध्ये टाकलं ते माझ्या चांगल्यासाठीच होतं, मी भाग्यवान होतो, असंही अमित शाह म्हणाले. त्यावेळी तुम्हाला माहित होतं का की तुम्ही जेलमधून निर्दोष मुक्त होणार आहात? असा प्रश्न विचारला असता लाईव्ह मुलाखतीतच अमित शाह म्हणाले की, आजच्या मुलाखतीचा विषय माझी केस नाहीये. आजची मुलाखत एका मोठ्या प्रभावशाली नेत्याबद्दल, एका मुख्यमंत्र्याबद्दल आहे. मी कायमच नरेंद्र मोदींसोबत आहे. ही सत्याची लढाई आहे, मला ती लढायचीच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone Security Alert: ‘आयफोन’ वापरत असाल तर आताच करा ‘हे’ काम, अन्यथा तुमचा फोन होणार हॅक!

AAP Pune Manifesto : पुणे पालिकेसाठी 'आप'चा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना मोफत बस प्रवास आणि 'मोहल्ला क्लिनिक'चे आश्वासन!

Sangli Election : एकाच प्रभागात अनेक दावे, अनेक गट, भाजपची अंतर्गत फूट, राष्ट्रवादीची जातीय मांडणी; प्रभाग आठ बनला रणांगण

Mumbai - Goa Highway : कोकणाच्या विकासाचा कणा अजूनही खड्ड्यातच; मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा अंत न दिसणारा प्रवास

Latest Marathi News Live Update : पुणे – नाशिक महामार्गावर रास्तारोको, वाहतूक ठप्प

SCROLL FOR NEXT