LK Advani, Amit Shah
LK Advani, Amit Shah 
देश

Loksabha 2019 : अमित शहांसाठी अडवानींचे तिकीट कापणार?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचे गुजरातमधील उमेदवारांच्या यादीतून नाव कापण्याचे शक्यता आहे. कारण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा यांना उमेदवारी देण्याची मागणी गुजरात प्रदेश समितीने भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीकडे केल्याची माहिती मिळत आहे. अडवानींऐवजी अमित शहांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अडवानी यांच्या वयामुळे त्यांना उमेदवारी न देता सध्या राज्यसभेचे खासदार असलेल्या अमित शहांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे.

कठीण वेळी भाजपला ‘अच्छे दिन’ दाखवणारा ‘लोहपुरूष’ अडगळीत गेला, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. अडवानी हे गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगरमधून सहावेळा लोकसभेवर निवडून गेलेले आहेत. शहा यांनी गांधीनगरमधून उमेदवारी मिळाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसीतून लढण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये मोदी वाराणसी आणि वडोदरा येथून निवडणूक लढले होते. भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे गुजरातमध्ये मिशन 26 पूर्ण करायचे आहे. गेल्या निवडणुकीत त्यांनी सर्व 26 जागा जिंकल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT