Amit Shah News esakal
देश

Amit Shah : नितीश कुमार हे तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत; अमित शाहांचं विधान

संतोष कानडे

Amit Shah on Nitish Kumar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नवादा येथून नितीश कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर तुटून पडले. २०२४मध्ये बिहारच्या सर्वच्या सर्व ४० जागांवर कमळ फुलेल, असा विश्वास शाहांनी बोलून दाखवला.

बिहारमधलं महायुतीचं सरकार आपल्या वजनानेच कोसळेल असं म्हणत अमित शाह यांनी २०२५ मध्ये बिहारमध्येही भाजपची सत्ता येईल, असं विधान केलं आहे.

ते पुढे म्हणाले की, नितीश कुमार पंतप्रधान होणारच नाहीत. देशातल्या जनतेने नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्याचा निश्चय केला आहे. तसेच बिहारच्या जनतेने राज्यातल्या सर्व ४० लोकसभा जागांवर भाजप उमेदवार निवडून देण्याचं ठरवलं आहे. तेजस्वी यादव यांचं बिहारचा मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न आम्ही कधीही पूर्ण होऊ देणार नाहीत.

लालू, नितीश यांच्यावर आसूड ओढत शाह पुढे म्हणाले की, ज्या सरकारमध्ये जंगलराजचे प्रणेते लालू यांचा पक्ष सहभागी आहे त्या बिहारमध्ये कधीही शांती प्रस्थापित होऊ शकणार नाही. लालूंच्या मुलाला मुख्यमंत्री व्हायचं आहे. पंरतु मी त्यांना सांगू इच्छितो की, लालूजी तुम्ही नितीश बाबूंना ओळखता, त्यांना पंतप्रधान व्हायचं आहे. पण तिथे जागा नाहीये.

देशातल्या जनतेने याहीवेळी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनवण्याचा निश्चय केला आहे. जर मोदी पंतप्रधान झाले तर नितीश बाबू तुमच्या मुलाला मुख्यमंत्री बनू देणार नाहीत.

ते पुढे म्हणाले की, नितीश कुमार हे सध्या गैरसमजात आहेत. परंतु बिहारची जनता गैरसमजात नाही. जनतेने ४० पैकी ४० जागा नरेंद्र मोदींना देण्याचं ठरवलं आहे. भाजपचे जेडीयूसाठी दरवाजे कायमस्वरुपी बंद असल्याचा पुनरुच्चार शाहांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT