amit shah paused his speech midway for azaan in baramulla jammu kashmir  
देश

Amit Shah: अजानसाठी अमित शाहांनी थांबवलं भाषण; विचारलं, आता बोलू का?

सकाळ डिजिटल टीम

Amit Shah Baramulla Rally: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बारामुल्ला येथे जाहीर सभेत बोलताना अचानक सुरू झालेल्या अजानसाठी भाषण थांबवले. अजान संपल्यानंतर समोर बसलेल्या लोकांची परवानगी मागीतली आणि लोकांकडून मिळालेल्या प्रतिसादानंतर त्यांनी पुन्हा भाषण सुरू केलं.

अमित शाह तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आहेत. आज तिसऱ्या दिवशी त्यांनी उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला येथे जाहीर सभेला संबोधित केले. दरम्यान जवळच्या मशिदीतून अजानचा आवाज आल्याने अमित शाह यांनी आपले भाषण मध्यंतरी थांबवले आणि अजान संपल्यानंतर अमित शहांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

दरम्यान भाषण पुन्हा सुरू करताना केंद्रीय मंत्री शाह म्हणाले, 'मला नुकताच संदेश मिळाला की जवळच्या मशिदीत प्रार्थनेची वेळ झाली आहे, आता संपली आहे मग आता बोलू का? अशी जनतेची परवानगी घेऊन त्यांनी पुन्हा भाषणाला सुरुवात केली.

शाहा यांनी जाहीर सभेत त्यांनी अब्दुल्ला, मुफ्ती आणि गांधी कुटुंब या तीन कुटुंबांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, 1947 ते 2014 पर्यंत केवळ चार वैद्यकीय महाविद्यालये बांधली गेली आणि 2014 ते 2022 पर्यंत 9 महाविद्यालये सुरू झाली. तीन घराण्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार बोकाळला. त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्रवेश दिला नाही.

पुढे जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पूर्वी हे दहशतवादी हॉटस्पॉट होते, आता ते पर्यटनाचे हॉटस्पॉट आहे. जम्मू-काश्मीरमधील वाढत्या पर्यटनामुळे येथील अनेक तरुणांना रोजगार मिळाला आहे. खोऱ्यातील निवडणुकांबाबत ते म्हणाले की, मतदार यादी तयार करण्याचे काम पूर्ण होताच जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण पारदर्शकतेने निवडणुका होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: OUT or NOT OUT? ध्रुव जुरेलचा वादग्रस्त झेल; श्रीलंकन संघ करणार तक्रार... गॉलवर वेगळाच राडा Video Viral

Marathi News Live Updates : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा आढावा

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

SCROLL FOR NEXT