Amit Shah and Nitish Kumar 
देश

Amit Shah : नितीश कुमार यांच्यासाठी भाजपचे दरवाजे बंद, PM पदासाठी...; अमित शहांचं मोठं विधान

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बिहार दौऱ्यावर आहेत. पश्चिम चंपारणमधील बेतिया येथे आयोजित सभेत अमित शहा म्हणाले की, बिहारमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. नितीश कुमार यांनी बिहारची फाळणी केली आहे. बनावट दारूमुळे लोकांचा मृत्यू होत आहे. पण दर तीन वर्षांनी नितीश कुमार पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहतात.

अमित शहा पुढं म्हणाले की, नितीशबाबू आयाराम-गयाराम मध्ये व्यस्त आहेत. ते जंगलराजच्या लोकांसोबत बसले आहेत. नितीश कुमार यांच्यासाठी आता भाजपची दारे बंद झाली आहेत. अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत गुन्हेगारी पुन्हा शिगेला पोहोचत असल्याचे म्हटले आहे.

खून, अपहरण, दरोड्याच्या घटना दररोज समोर येत आहेत. भाषिक पत्रकारांच्या हत्येला सुरुवात झाली आहे. पीएफआयसारख्या संघटना बिहारमध्ये शिरकाव करत होत्या, पण नितीशबाबू गप्प होते. मोदींनी पीएफआयवर बंदी घालून संपूर्ण देशाला सुरक्षित करण्याचे काम केल्याचं शहा यांनी नमूद केलं.

अमित शहा एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले की, नितीशबाबू विकासवादी ते पंतप्रधान होण्यासाठी संधीसाधू झाले. काँग्रेस आणि राजदच्या आश्रयाला गेले. नितीशबाबूंच्या पंतप्रधानपदाच्या महत्त्वाकांक्षेने बिहारचे विभाजन झाले आहे. आज सुरू असलेल्या जंगलराजपासून मुक्तहोण्याचा एकमेव मार्ग म्हणजे २०२४ मध्ये भाजपचे सरकार स्थापन करून मोदींना पंतप्रधान बनविणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT