BCCI 
देश

भाजपचा बीसीसीआयमध्ये शिरकाव; अमित शहांचे पुत्र सचिव

वृत्तसंस्था

मुंबई : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपने आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळातही (बीसीसीआय) शिरकाव केल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा मुलगा जय शहा याला सचिवपदी, तर खासदार अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमाळ यांना खजिनदारपदी निवडण्यात आले आहे.

माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांचे नाव जवळपास निश्चित होत असताना नाट्यमय घडामोडीनंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले आहे. तर, भाजपचे अमित शहा यांचे पुत्र जय शहा सचिव तर भाजपचे मंत्री आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण धुमाळ खजिनदार होणार आहेत. भारतीय क्रिकेट मंडळाची बहुचर्चित निवडणूकीअगोदर महत्वाची घटना घडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते गुजरात क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष राहिलेले आहेत.

बीसीसीआयशी संलग्न असलेल्या राज्य संघटनांच्या आणि माजी पदाधिकाऱ्यांची आज बैठक होऊन महत्वाच्या तीन पदांसाठी नावे निश्चित करण्यात आली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या अखेरचा दिवस आहे. ब्रिजेश पटेल यांच्यासाठी तमिळनाडूचे एन. श्रीनिवासन यांनी लॉबिंग केले होते, परंतु अनेकांनी त्यास विरोध केला आणि अखेरच्या क्षणी गांगुली यांचे नाव पुढे आले. आता निवडीमुळे भारतीय क्रिकेट मंडळावरही भाजपचे वर्चस्व असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT