Amit Shah  esakal
देश

Amit Shah : 'जम्मू'मधून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी केंद्राचा 'बिग प्लॅन', डोवाल यांच्या उपस्थितीत अमित शाहांची उच्च स्तरीय बैठक

संतोष कानडे

नवी दिल्लीः जम्मू विभागात मागच्या दिवसांपासून अनेक दहशतवादी घटना घडत आहेत. शिवाय अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेवरुन प्रश्न उपस्थित होत असतानाच रविवारी अमित शाहांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः गृहमंत्री अमित शाह असतील.

सकाळी ११ वाजता दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉकमध्ये होणाऱ्या या बैठकीत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल, एनएसए अजित डोवाल, गृह सचिव, आयबी चीफ, रॉ चीफ, एनआयएचे डीजी, आर्मी, एअरफोर्स यांच्यासह इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

बैठकीत आयबी आणि रॉ प्रमुख सध्याच्या गुप्तचर अहवालाची माहिती केंद्रीय गृहमंत्र्यांना देतील. इतकेच नाही तर या बैठकीत जम्मू भागात गेल्या काही दिवसांत ज्या पद्धतीने दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्या मुद्द्यावरही चर्चा होणार आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये 4 दिवसांत दहशतवाद्यांनी 4 हल्ले केले आहेत. रियासी, कठुआ आणि डोडा येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलांनी कठुआमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला. उर्वरित दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. आजच्या बैठकीमध्ये केंद्र सरकार नेमकं कोणते पावलं उचलणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasala Dam : खडकवासला धरणसाखळीत जूनमध्ये पावसाची शंभरी

मुंबईत संततधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक उशिराने; अनेक भाग जलमय, ४ दिवस ऑरेंज अलर्ट

Kolhapur Bus Accident : काळीज पिळवटणारी घटना! कुटुंबाला दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या शासकीय लिपिकाचा अपघातात दुर्दैवी अंत; पत्नी गंभीर जखमी, चिमुरडी आयसीयूमध्ये!

Maharashtra 21 District Rain Alert : महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट; गोवा, कारवारमध्ये मोठे ढग दाटले; पुढच्या ३ दिवसांचा हवामान अंदाज

Latest Marathi News Live Update : पुढील 4 दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT