Amritsar train accident Driver says was given green signal to go on
Amritsar train accident Driver says was given green signal to go on 
देश

Amritsar Rail Accident : आम्हाला ग्रीन सिग्नल दिला ; रेल्वेचालकाचा दावा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : अमृतसर येथे झालेल्या रेल्वे अपघातात 61 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर रेल्वेचालकाने खळबळजनक दावा केला आहे. यामध्ये त्याने सांगितले, की ''आम्हाला ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. रेल्वे ट्रॅकवरील सर्व काही सुरळीत असल्याचे सांगण्यात आले होते. शंभरपेक्षा अधिक लोकं रेल्वेरूळावर थांबल्याची आम्हाला कल्पना नव्हती'', असा दावा संबंधित रेल्वेचालकाने केला. 

पंजाबच्या अमृतसर येथील जोडा फाटक येथे लोहमार्गाच्या शेजारील मोकळ्या जागेत रावणदहनाचा कार्यक्रम काल (शुक्रवार) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान 61 हून अनेकांचा मृत्यू झाला, तर 72 जण जखमी झाले. रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वेचालकाने दावा केला, की ''आम्हाला ग्रीन सिग्नल देण्यात आला होता. मात्र, सगळं काही सुरळीत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. त्यामुळे रेल्वेरुळावर किती लोकं उभे होते याची आम्हाला कल्पना नव्हती''.  

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अमृतसर रेल्वे अपघातातील जखमींची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या अपघाताची चौकशी करून चार आठवड्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्हापुरात PM मोदींच्या भाषणाला सुरूवात

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का! रोहितपाठोपाठ ईशान किशनही परतला माघारी

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT