Amul Cartoon on Elon Musk sakal
देश

''यह चीज बडी हैं...'', एलॉन मस्कवर Amul चं भन्नाट कार्टून

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दुग्धजन्य पदार्थांची विक्री आणि मार्केटींग करणारी सर्वात मोठी कंपनी अमूल (Amul) व्यंगचित्रांद्वारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर विनोदी पद्धतीने भूमिका मांडण्यासाछी प्रसिद्ध आहे. यापूर्वी अमूलने अनेक मुद्द्यांवर भाष्य केले आहे. आता एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर अमूलने एक मजेशीर व्यंगचित्र (Amul Cartoon on Elon Musk) ट्विट केले आहे.

'ये चीज बडी हैं मस्क-मस्क', असं कॅप्शन देत एक कार्टून शेअर केलं आहे. यामध्ये एलॉन मस्क हे चमच्या ट्विटरच्या चिमणीला बटर खाऊ घालताना दाखवलं आहे. या ट्विटला लाखो लोकांनी लाईक केले असून अनेकांनी रिट्विट केले आहे.

मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. यामुळे ते या कंपनीचे सर्वांत मोठे भागधारक बनले होते. यानंतर मस्क ट्विटर पूर्णपणे खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यांनी १४ एप्रिल रोजी दिला होता. अखेर एलॉन मस्क यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच म्हणजे २६ फेब्रुवारीला ४४ बिलियन डॉलरमध्ये ट्विटर विकत घेण्याचा करार केला आहे. यामुळे आता ट्विटरचे संपूर्ण हक्क हे मस्क यांच्याकडे असणार आहेत. त्यांनी ट्विटवर लोकांचा अधिक विश्वास बसावा, यासाठी सुधारणा करणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच ट्विटर मेसेंजरमध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन लागू करण्यात येणार आहे, असंही मस्क यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, एलॉन मस्क यांनी आज सकाळीच ट्विट करून कोका कोला कंपनी खरेदी करण्याची घोषणा केली. मला कोका कोला कंपनी खरेदी करायची आहे, जेणेकरून मला त्याला कोकेन पुन्हा मिसळता येईल, असं एलॉन मस्क यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Forecast : राज्यातील धरणे १०० टक्के भरणार? पुढील चार दिवस कसे राहणार; हवामान विभागाचा ताजा अंदाज

Supreme Court: केवळ आंदोलन आहे म्हणून लाठीमार योग्य नाही; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला सुनावले, आंदोलनाचा अधिकार अबाधित

NEET Result: कऱ्हाडमध्ये ‘नीट’मधील अपयशामुळे मुलीने जीवन संपवले; निकालानंतर होती तणावात..

Khadakwasla Dam: खडकवासला धरणसाखळी ९० टक्के भरली; पानशेतमधून वीज निर्मितीसाठी प्रथमच ६०० क्युसेक विसर्ग, मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Ragi Uppu Urundai Recipe: नाचणी सत्त्व विसरा! फक्त 1 कप नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ, चविष्ट उप्पू उरुंडई; नाश्ता आणि टिफिनसाठी बेस्ट

SCROLL FOR NEXT