Amul Milk esakal
देश

Amul Milk Price Hike : अर्थसंकल्प सादर होताच सामान्यांना मोठा झटका; अमूलकडून दुधाच्या दरात वाढ

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Amul Milk Price Hike : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लगेचच सर्व सामान्यांना मोठा झटका बसला आहे.

गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडने दुधाच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. 

अमुलने दुधाच्या दरात प्रतिलिटर तीन रुपयांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. नवीन दर तत्काळ प्रभावाने लागू झाल्या असून, नव्या घोषणेनंतर ग्राहकांना अमूल गोल्डसाठी 66 रुपये प्रति लिटर, अमूल फ्रेशसाठी 54 रुपये प्रति लीटर पैसे मोजावे लागणार आहेत.

तर, अमूल गायीच्या दूधासाठी 56 रुपये प्रति लिटर आणि अमूल ए2 म्हशीच्या दूधासाठी 70 रुपये प्रति लीटर मोजावे लागणार आहेत. कंपनीच्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला असून, यामुळे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

अमूलने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी दरवाढ केली होती. एकूण कामकाजाचा खर्च वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. अमुलशिवाय गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT