Milk Esakal
देश

अमूल दूध महागलं! देशभरात १ जुलैपासून दोन रुपयांची दरवाढ

अमूल गोल्ड दूध ५८ रुपये प्रतिलिटर दरानं मिळणार आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : कोरोना काळात देशातील जनता महागाईने त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती शंभरी पार गेल्या आहेत. त्याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर झाला आहे. यापार्श्वभूमीवर गुजरात सहकारी दूध विपणन संघाने (अमूल दूध संघ) आपल्या दुधाच्या किंमतीत दोन रुपये प्रतिलिटरने वाढ केली आहे. उद्यापासून (१ जुलै) ही दरवाढ लागू होणार आहे.

अमूल दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी म्हणाले, "सुमारे एक वर्ष आणि सात महिन्यांनतर आमच्या ब्रँडच्या दुधाच्या किंमतीत वाढ केली जात आहे. दूध उत्पादन प्रक्रियेत वाढ झाल्यानं ही दरवाढ करणं क्रमप्राप्त आहे. त्यामुळे आता अमूल गोल्ड दूध ५८ रुपये प्रतिलिटर दरानं मिळणार आहे.

यामुळे वाढली किंमत

सोढी म्हणाले, "अमूल दूधाच्या किंमतीत उद्यापासून संपूर्ण भारतात दोन रुपये प्रतिलिटरने वाढ करण्यात आली आहे. सोना, ताजा, शक्ती, टी-स्पेशल या सर्व ब्रँडसह गाय आणि म्हैशीच्या दूधासाठी ही दरवाढ लागू होणार आहे. महागाईत वाढ झाल्यानं दूधाच्या किंमती वाढवण गरजेचं बनलं होतं. याशिवाय पॅकेजिंगच्या खर्चात ३० ते ४० टक्के, वाहतूक खर्चात ३० टक्के आणि ऊर्जेच्या खर्चात ३० टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे दूधाच्या किंमतीत वाढ झाली आहे.

या उत्पादनांवर होणार परिणाम

दूधाच्या किंमतीत वाढ झाल्याने तूप, पनीर, लोणी, लस्सी आणि ताक तसेच मिठाई, चॉकलेट या दुग्दजन्य पदार्थांच्या किंमतीतही वाढ होऊ शकते. यामुळे सहाजिकच सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार आहे.

भारतात या कंपन्या विकतात दूध

राज्यांमधील दूध संघांव्यतिरिक्त देशांत नेस्ले, ब्रिटानिया, नमस्ते इंडिया, पतंजली, आनंदा यांसारख्या खासगी कंपन्या आपापल्या बँडचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विकतात. अमूल या देशातील मोठ्या आणि प्रसिद्ध ब्रँडनं दूधाच्या किंमतीत वाढ केल्यानं बाकीच्या कंपन्या देखील आपल्या ब्रँडच्या दूधाच्या किंमतीत वाढ करु शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

कोकण आपलोच आसा! सनई चौघडे मालिकेची टीम पोहचली कणकवलीत, फोटो पाहिलेत का?

MPSC Paper Leak: परीक्षा झाली, मुलाखतीही झाल्या; मग MPSC ने संपूर्ण भरतीच का रद्द केली? पेपरफुटीचा मुद्दा पुन्हा चर्चेत

Latest Marathi News Live Update : टीम कुक ‘ॲपल’ची धुरा सोडणार

Kolhapur Gender Determination Case: गर्भलिंग निदानप्रकरणी ‘एस.पी. टोळी’ला मोका; राज्यातील पहिलीच कारवाई; ११ जणांवर बडगा

SCROLL FOR NEXT