Rahul Gandhi  Sakal
देश

Amul vs Nandini: अमूल-नंदिनी वादात राहुल गांधींची एंन्ट्री; ट्विट करत म्हणाले; कर्नाटकची...

राहुल गांधींनी बेंगळुरूच्या जेपी नगर येथील नंदिनी मिल्क पार्लरला भेट दिली.

राहुल शेळके

Amul vs Nandini: नंदिनी विरुद्ध अमूल या कर्नाटकात सुरू असलेल्या वादात राहुल गांधींची एन्ट्री झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी रविवारी नंदिनी मिल्क पार्लरमध्ये पोहोचले.

तिथून त्यांनी एक आईस्क्रीम विकत घेतलं आणि हा ब्रँड कर्नाटकची शान असल्याचे म्हटले आहे. कर्नाटक दूध महासंघाच्या प्रमुख ब्रँड नंदिनीला त्यांनी सर्वोत्कृष्ट म्हणून संबोधले आहे.

कर्नाटकच्या दोन दिवसीय दौऱ्यावर राहुल गांधी यांनी बेंगळुरूच्या जेपी नगर येथील नंदिनी मिल्क पार्लरमध्ये काही वेळ घालवला. त्यांच्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि पक्षाचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल होते.

राहुल गांधींनी नंतर त्याचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आणि लिहिले, "कर्नाटकचा अभिमान - नंदिनी बेस्ट आहे!"

अमूलने बेंगळुरूला दूध पुरवठा करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर दोन ग्रुपमधील वाद सुरू झाला. यावर विरोधी काँग्रेस आणि जेडी(एस) म्हणाले की, भाजपला कर्नाटकात अमूल आणून नंदिनीला संपवायचे आहे.

त्यामुळे नंदिनी उत्पादनांचा तुटवडा निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. मात्र, बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने हा आरोप फेटाळून लावला. अमूलकडून नंदिनीला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले होते.

काय म्हणाले कर्नाटकचे मुख्यमंत्री?

या प्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले होते की, अमूल ब्रँडबद्दल काळजी करण्याची गरज नाही. आम्ही नंदिनी ब्रँडला देशात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आणखी स्पर्धात्मक बनवू. विरोधक या मुद्द्यावरून राजकारण करत आहेत.

दुसरीकडे, आरोग्यमंत्री के. सुधाकर सांगतात की, नंदिनी व्यतिरिक्त राज्यात सुमारे 18 ब्रँडची विक्री दीर्घकाळापासून सुरू आहे. अमूल हा भाजपचा ब्रँड आणि नंदिनी हा काँग्रेसचा ब्रँड आहे का? अमूल दूध आणि इतर उत्पादनांच्या विक्रीविरोधात काँग्रेसने राज्यात मोहीम सुरू केली आहे.

वाद कसा सुरू झाला?

केंद्रीय मंत्री अमित शाह 30 डिसेंबर रोजी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात होते. येथे त्यांनी 260 कोटी खर्चून बांधलेल्या डेअरीचे उद्घाटन केले. ही डेअरी दररोज 10 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करेल आणि नंतर त्याची क्षमता 14 लाख लिटर प्रतिदिन होईल, असे सांगण्यात आले.

त्यानंतर ते म्हणाले की, अमूल आणि नंदिनी मिळून कर्नाटकातील प्रत्येक गावात प्राथमिक डेअरी उभारण्याचे काम करणार असून 3 वर्षात कर्नाटकातील एकही गाव असे नसेल जिथे प्राथमिक दुग्धालय नसेल. तेव्हापासून हे प्रकरण तापले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT