An elephant was found dead in Saung river in uttarakhand टिम ई सकाळ
देश

नदी किनारी मृतावस्थेत आढळला हत्ती; मृत्यूचं कारण काय?

दोन हत्तीमधील आपसी संघर्षामध्ये हत्तीचा मृत्यु झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तवती जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संस्कृतीत हत्तीला (Elephant) दैव्य रूप मानले जाते.यात देशात दिवसेंदिवस हत्तींच्या मृत्युचे प्रमाण वाढत आहे.या आधीही आसाम (Assam)आणि केरळ (Kerala) मध्ये हत्तींच्या मृत्युच्या घटना समोर आल्या होत्या आणि आता उत्तराखंडात (Uttarakhand) एक हत्ती मृतावस्थेत आढळून आलाय. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. (An elephant was found dead in Saung river in uttarakhand)

शनिवारी दुपारी काही लोकांना उत्तराखंडातील ऋषिकेशजवळील राजाजी नॅशनल पार्कला लागून असलेल्या साहेब नगर, ग्रामपंचायतीतील सौंग नदीत हत्तीचा मृतदेह पडलेला दिसला. घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी घटनास्थळी पोहचले तर त्यावेळी हत्तीच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळल्या. दोन हत्तीमधील आपसी संघर्षामध्ये हत्तीचा मृत्यु झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता वर्तवती जात आहे. याविषयी अधिक तपास सुरू आहे.

या घटनेविषयी राजाजी राष्ट्रीय उद्यान प्रशासनाने माहिती दिली. हत्तीचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात येत आहे. त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT