देश

लोखंडी सूट तयार करुन झाला 'आयर्न मॅन'; आनंद महिंद्रांनी पाळला शब्द

मणिपूरच्या प्रेम निनगोमबमनं आर्यन मॅनचा सूट तयार केला होता. त्याचा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मणिपूरच्या प्रेम निनगोमबमनं आयर्न मॅनचा सूट तयार केला होता. त्याचा व्हिड़िओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ जेव्हा देशाचे प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पाहिला तेव्हा ते प्रभावित झाले होते. कुठलीही सुविधा नसताना प्रेमनं केलेली कामगिरी त्यांना कमालीची आवडली होती. त्यांनी त्याला तो प्रोजेक्ट पूर्ण करण्यास सांगितले होते. आणि एक वचनही दिलं होतं. प्रेमनं आपलं काम पूर्ण केलं. आणि महिंद्रा यांनी देखील आपला शब्द पाळला आहे. याबाबत महिंद्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आहे.

प्रेम हा तेव्हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आला होता. त्याचे कारण म्हणजे त्यानं आनंद महिंद्रा यांनी त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ शेयर केला होता. प्रेमनं एक लोखंडी सुट तयार केला होता. त्यानं मार्वलच्या सीरिजची प्रेरणा घेऊन तो सूट तयार केला होता. त्यातून त्यानं लोखंडी आयर्न मॅनचा सुट बनवला होता. त्यानं त्यासाठी एका भंगाराच्या दुकानातून लोखंड गोळा केलं. आणि त्याच्या मदतीनं तो सूट तयार केला होता. त्या सूटचं वैशिष्ट्य म्हणजे तो रिमोटवर चालणारा सूट होता. प्रेमनं जेव्हा त्याचा व्हि़डिओ सोशल मीडियावर शेय़र केला तेव्हा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

प्रेमनं जी कामगिरी केली त्यामुळे आनंद महिंद्रा प्रभावित झाले होते. त्यांनी त्याचं कौतूक करायचं ठरवलं. त्याच्या प्रयत्नांना आणखी बळ देण्यासाठी आणि त्याचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांनी त्याला मदतीचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला मदत करण्याचा शब्द दिला होता. त्यानंतर त्यांची पूर्ण टीम ही प्रेमच्या घरी गेली. त्या ग्रुपच्या अधिकाऱ्यांनी प्रेमच्या कुटूंबियासमवेत मोठ्या प्रेमानं बातचीत केली. त्याच्याशी संवाद साधला. त्यामुळे त्याचे कुटूंबिय देखील प्रभावित झाले होते. आनंद महिंद्रा यांनी प्रेमला इंजिनिअरींगचं शिक्षण घेण्यासाठी हैद्राबादला पाठवलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT