Aanand Mahindra Viral tweet 
देश

युवा दिनी आनंद महिंद्रांचं ट्विट, 'माझी बॅटरी रिचार्ज होते जेव्हा मी…'

सकाळ डिजिटल टीम

भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असतात, खासकरुन त्यांनी केलेले ट्विट सतत चर्चेचा विषय बनतात, आज राष्ट्रीय युवा दिनानिमीत्त (National Youth Day) त्यांनी त्यांचा एक खास फोटो शेअर केला आहे, या फोटोमध्ये महिंद्रा हे लहान मुलींसोबत शाळेतील बाकड्यावर बसलेले दिसत आहेत. महिंद्राचा हा फोटो लगेच व्हायरल झाला आणि लोकांनी वेगवेगळ्या कमेंट करायला सुरुवात केली.

स्वामी विवेकानंद यांची जयंती दरवर्षी १२ जानेवारी रोजी राष्ट्रिय युवा दिन म्हणून साजरी केली जाते. हा दिवस साजरा करतान आनंद महिंद्रा यांनी हा फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये ते वर्गातील शेवटच्या बाकावर मुलींसोबत बसलेले दिसत आहेत. या फोटोसोबत त्यांनी एक मोटिव्हेशनल मेसेज देखील दिला आहे.

आनंद महिंद्रा लिहीतात की, 'आज राष्ट्रीय युवा दिनानिमित्त, माझा विश्वास आहे की आपण फक्त वयाने तरुण असणे साजरे करत नाही, तर मनाने तरुण असणे देखील साजरे करतो. मला विश्वास आहे की आपल्या सभोवतालच्या जगाचे ताजे आणि तरुण चित्र जतन करणे गरजेचे आहे. कारण मी जेव्हा आपल्या लहानग्या कळ्यांच्या (नन्ही कली) वर्गात जातो, तेव्हा माझी बॅटरी सर्वात जास्त चार्ज होते.' दरम्यान त्यांच्या या ट्विटवर लोकांकडून वेगवेगळ्या मजेशीर कंमेट केल्या जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT